छगन भुजबळांना कोरोनाची लागण : शरद पवारांचीही चाचणी होणार ?  

0
162

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी नुकतीच आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यामुळे पवारांचीही चाचणी घेण्यात येणार असल्याचे समजते.

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन  भुजबळ यांनी केले आहे. दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील,  राजेश शिंगणे आणि एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.