‘छ. शिवाजी महाराज बसस्थानक, इचलकरंजी’ फलक उतरविल्याने शिवप्रेमी-परिवहन प्रशासनात वादावादी  

0
177

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीमधील मध्यवर्ती बसस्थानकावर लावण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक नामफलक परिवहन महामंडळाच्या प्रशासनाकडून आज (शनिवार) अचानक उतरवण्यात आल्याने शिवप्रेमी संतप्त झाले. त्यांनी हा फलक पूर्ववत लावण्यात यावा, अशी मागणी प्रशासनाकडे करत ठिय्या आंदोलन केले. या वेळी आ. प्रकाश आवाडे व प्रशासन यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली. अखेर परिवहन राज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी संपर्क चर्चा करण्यात आली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी मंगळवारी यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर  ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी मराठा समन्वय समितीचे पुंडलिक जाधव, मराठा महासंघाचे संतोष सावंत, ताराराणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, नगरसेवक सुनील पाटील, राजू बोंद्रे, मोहन मालवणकर, उत्तम रवंदे, आनंद मकोटे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.