सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांमध्ये बदल

१ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी  

0 550

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेंशन नियमांमध्ये बदल केले आहेत. आता सात वर्षांपेक्षा कमी सेवाकाळात सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यांना वाढीव पेंशन मिळणार आहे. याआधी एखाद्या कर्मचाऱ्याचा सात वर्षांपेक्षा कमी सेवाकाळात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला अखेरच्या वेतनचा ५० टक्क्यांच्या हिशोबाने  रक्कम मिळत असे. मात्र आता आता कुटुंबला पेंशनची अधिक वाढलेली रक्कम मिळेल.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय सिविल सेवा (पेंशन) नियम, १९७२ मध्ये संशोधन करण्यास मंजुरी दिली आहे. १ ऑक्टोबर २०१९ पासून हा नवीन नियम लागू होईल. याचा फायदा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांच्या विधवा पत्नींना मिळेल. सरकारी अधिसूचनेत सांगण्यात आले आहे की, असे सरकारी कर्मचारी ज्यांचा मृत्यू १ ऑक्टोबर २०१९ पर्यंत १० वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करण्याच्या आधी झाला आहे आणि त्यानंतर ७ वर्षांचा कार्यकाळ देखील पुर्ण केलेला नाही, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला १ ऑक्टोबर २०१९ पासून उपनियम (३) अंतर्गत पेंशनची वाढलेली रक्कम मिळेल.

तसेच, ग्रॅच्युइटीबद्दल सांगण्यात आले आहे की, ग्रॅच्युइटीची रक्कम ही कार्यकाळाचा आढावा आणि सत्यता तपासल्यानंतर निश्चित करण्यात येईल. कार्यालय देखील ही रक्कम ग्रॅच्युइटी देण्याच्या काळापासून ते मृत्यूच्या सहा महिन्याच्या आत निश्चित करावी लागेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More