पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अमराठी कार्यकर्ते आणि नेते सहभागी होणे, ही चांगली गोष्ट आहे. मनसेसोबत युती होऊ शकते. पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. ते पुण्यामध्ये पत्रकारांशी आज (गुरुवार) बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोणी आपला पक्ष कसा वाढवायचा, याचे स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीत आहे. मनसेमध्ये अमराठी सहभागी होत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. मनसेच्या देशभक्ती आणि हिंदुत्वाबद्दल शंका नाही. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीबाबत तुम्ही विचारत असाल, तर मनसेसोबत युती होऊ शकते. पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले.