मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीतील मतपत्रिकेवरून गंभीर आरोप केले आहेत. ‘मराठवाडा आणि पुण्यात मतदानादरम्यान मतपत्रिका या कोऱ्या होत्या, असा आरोप त्यांनी केला आहे. याबद्दल पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेणार असल्याचे पाटील यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. या सगळ्या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी २८ कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात आली आहे. २८ कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. काही जणांकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी आहे. हे कार्यकर्ते ग्रामपंचात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय स्थिती आहे. किती ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते उभे आहेत. त्यातील किती गावे ही भाजपच्या सरपंच करण्याच्या दिशेने जातील, अशी सर्व योजना आखतील.