पुणे (प्रतिनिधी) : चंद्रकांतदादा आपलं जितक वय आहे, तितकी शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आहे, असा टोला  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांना आज (मंगळवार) येथे लगावला.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर केलेले भाष्य मतीगुंग करणारे आहे. खोटं बोल पण रेटून बोल,  अशी शरद पवार यांची प्रवृत्ती आहे,  अशी टीका यांनी  पाटील यांनी सोमवारी  कोल्हापुरात बोलताना केली होती. या टीकेचा चाकणकर यांनी खरपूस समाचार घेतला.

चाकणकर पुढे म्हणाल्या की, चंद्रकांतदादा  आपलं जितक वय आहे, तितकी शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आहे. हे आपण लक्षात घ्यावं. ४ दिवस दिल्लीत थांबूनही तुम्हाला अमित शहा यांनी भेट नाकारली, याबाबत तुम्ही आत्मचिंतन करावे, असा टोला चाकणकर यांनी लगावला.