Published June 7, 2023

मुंबई ( प्रतिनिधी ) काल मुंबई मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका 20 वर्षाच्या तरुणीचा विवस्त्र स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली या तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेपासून वसतिगृहाचा सुरक्षारक्षक गायब होता. त्यानेच हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र, या गुन्ह्यातील आरोपी सुरक्षारक्षक प्रकाश कनोजिया याने ग्रॅन्ट रोड आणि चर्नी रोड स्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या याप्रकरणी तसाप सुरु आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ दखल घेत या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी तसेच दुसरी समिती मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेचा अहवाल सादर करण्यासाठी स्थापन केली आहे. यासमित्यांना 14 जूनपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

मुंबईतील ती घटना अतिशय वेदनादायी

मुंबईची घटना अतिशय वेदनादायी असून, याची दखल शासनाने गांभीर्याने घेतली आहे. या घटनेच्या सखोल चौकशीसाठी तत्काळ समिती स्थापन करण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे पाटील म्हणाले. दोन्ही समित्यांचा अहवाल लवकरात लवकर मिळावा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले असल्याची माहिती पाटील यांनी दिले.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023