चंद्रकांतदादा पाटील यांचेकडून सुहासिनीदेवी घाटगे यांच्या प्रकृतीची विचारपूस

0 841

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेकडून कागलच्या राजमाता सुहासिनीदेवी घाटगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी अन्यथा काहीतरी बरेवाईट घडेल अशी धमकी त्यांच्या मातोश्री सुहासिनीदेवी घाटगे यांना अज्ञातांनी मोबाईलवर दिली होती. या प्रकाराचा कागल तालुका आणि गडहिंग्लज, उत्तूर परिसरातील गावातून निषेध करण्यात आला.

सुहासिनीदेवी घाटगे यांच्या दोन मोबाईल नंबरवर धमकीचे फोन आले होते. ‘शेत जाळीन, मुरगुडमधील बांध फोडीन आणि तुमचा मुलगा समरजितसिंह  एकटा-दुकटा फिरत असतो. त्यांनी निवडणूकीतून माघार घ्यावी असे धमकीचे स्वरूप होते. समरजितसिंह हे प्रचारात व्यस्त असल्याने श्रीमती घाटगे यांनी याची फारशी वाच्यता केली नाही. परंतु सुहासिनीदेवी घाटगे यांना भीतीमुळे मानसिक ताण आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना तशी कल्पना देण्यात आली व नंतर शाहूपुरी पोलिसात लेखी तक्रार  देण्यात आली.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तातडीने श्रीमती घाटगे यांची आज (बुधवार) कागलमधील निवासस्थानी भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. काल श्रीमती घाटगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून आज अनेक कार्यकर्ते, महिलांनी श्रीमती घाटगे यांची भेट घेऊन  तब्येतीची विचारपूस केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More