चंद्रकांत पाटील लॉटरी लागून झालेले आमदार : सतेज पाटील

0
44

पंढरपूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मागच्या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे लॉटरी लागून निवडून आलेले होते. कारण आठव्या नवव्या फेरीमध्ये त्यांना विजय मिळाला होता, अशी टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि जयंत साळगावकर यांच्या प्रचारासाठी सतेज पाटील हे पंढरपूरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही टीका केली.

ते म्हणाले, भाजपच्या विचारांना थांबवणे ही काळाची गरज आहे. यामुळेच राज्याच्या सत्तेमध्ये महाविकास आघाडीतील घटक एकत्र आले आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये पूर्वी इतकी चुरस नव्हती. मात्र,आता तीनही पक्ष राज्यांमध्ये ५ जागा लढवत असून याठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय पक्का आहे.