चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड पंचायत समितीची जुनी प्रशासकीय इमारत चंदगड नगरपंचायतसाठी नाममात्र भाडेतत्त्वावर मिळावी. अशी मागणी  चंदगड पंचायतीच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे आज (रविवार) पत्राद्वारे केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, चंदगड नगरपंचायतीची सध्याची इमारत जागेअभावी अपुरी पडत आहे. ही इमारत छोटी असल्यामुळे सर्व विभाग व्यवस्थित चालवणे अवघड जात आहे. चंदगड पंचायत समितीची जुनी प्रशासकीय इमारत सध्या मोकळी आहे. ही इमारत नगरपंचायतसाठी नाममात्र भाडेतत्वावर मिळावी, अशी मागणी या पत्राद्वारे केली. यावेळी चंदगड नगरपंचायतीच्या स्थायी समितीचे सभापती अभिजित गुरबे यांनी हे पत्र पालकमंत्री पाटील यांच्याकडे दिले.

यावेळी नगरसेवक मेहताब नाईक, बाळासाहेब हळदणकर, अनिता परीट, अनुसया दाणी, मुमताजबी मदार उपस्थित होते.