चंदगड (प्रतिनिधी) : राज्याचे गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सोमवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून चंदगड तालुका काँग्रेसने व्ही. के. चव्हाण-पाटील महाविद्यालय पाटणे फाटा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जवळपास ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन संभाजीराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप नांदवडेकर, नितीन फाटक या सतेज टीमने केले.

यावेळी गोपाळराव पाटील, सभापती आनंद कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष संजय सरदेसाई, विलास पाटील, कल्लापा भोगण, विक्रम पाटील, वसंत रामू पाटील, दौलत वर्पे, उत्तम पाटील, जी. बी. पाटील, बाबासाहेब नौकुडकर, प्रा. भरमाण्णा पाटील, जयवंत शिंदे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.