मुंबई (प्रतिनिधी) : मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात येत्या ४ ते ५ दिवसांत गारपीटीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने  वर्तवली आहे. उत्तर आणि मध्य भारतावर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भमध्ये पावसाची अधिक शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी दक्ष राहावे. विदर्भात  काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. विदर्भात आणि मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले.