कोल्हापुरात चक्काजाम : आंदोलक- पोलिसांमध्ये झटापट (व्हिडिओ)

0
177

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना व किसान संघर्ष समितीच्या वतीने आज (शनिवार) सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी दाभोलकर कार्नर येथे आक्रमक  झालेले आंदोलक  आणि पोलिसांमध्ये झटापट  झाली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.