कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : राज्यभरातील ग्राहकांच्या मागणीनुसार गोकुळकडून ‘बासुंदी’ लवकरच विविध फ्लेवरमध्ये उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली. ते आज (सोमवार) गोकुळ प्रकल्प येथे ‘बासुंदी’ लाँचिंगवेळी बोलत होते. यावेळी संचालक आणि अधिकारी उपस्थित होते.

सध्‍या कोल्‍हापूर, पुणे, मुंबई, सिंधुदूर्ग, रत्‍नागिरी, सांगली, बेळगांव, गोवा येथे गोकुळ दूधाबरोबर तूप, श्रीखंड, टेबल बटर, कुकिंग बटर, पनीर, लस्‍सी, दही, ताक, टेट्रा पॅक दुधाची विक्री केली जाते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन संघाने ‘गोकुळ बासुंदी’ विक्रीसाठी उपलब्ध करून देणेचा निर्णय संचालक मंडळाने नुकताच घेतला होता. याची अंमलबजावणी म्हणून आज गोकुळच्या बासुंदीचे लाँचिंग सुरवातीच्या काळात बासुंदी २५० ग्रॅम व ५०० ग्रॅम अशा पॅकिंगमध्ये उपलब्ध केली आहे अंजीर, सीताफळ, बटरस्कॉच व इतर सर्व फ्लेवरमध्ये ही बासुंदी लवकरच उपलब्ध होणार आहे. पुढील काळात १ किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध करून देणेचे नियोजन केले आहे. वितरकांबरोबरच मोठ्या शहरांमधील मुख्य मॉलमध्ये बासुंदी उपलब्ध करून देणेत येणार आहे. बासुंदीच्या उत्पादनामुळे संघाकडे अतिरिक्त ठरणाऱ्या दुधाची काही प्रमाणात निर्गत लावणे शक्य होणार असल्याचे चेअरमन विश्वास पाटील यांनी या प्रसंगी सांगितले.

या वेळी चेअरमन ज्येष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक नविद मुश्रीफ, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, अंबरिषसिंह घाटगे, अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, इतर अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.