‘गोकुळ’चा नवीन उच्‍चांक : एका दिवसात १५ लाख २५ हजार लिटर्स दूध विक्री

0
698

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) दररोजच्‍या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्‍याने वाढ होत आहे. यावर्षी गोकुळने नवीन उच्‍चांक स्थापित करताना १५ लाख २५ हजार लिटर्स इतक्या दुधाची विक्री एक दिवसात केलेली आहे. गतवर्षी याच दिवशी म्‍हणजे ईदच्‍या दिवशी १२ लाख ६२ हजार लिटर्स इतकी दूध विक्री गोकुळने एक दिवसात केलेली होती. गतवर्षीच्या तुलनेत गोकुळच्‍या विक्रीत सुमारे २ लाख ६३ हजार लिटर्सची वाढ झाल्याची माहिती चेअरमन विश्‍वास पाटील यांनी दिली.

या कौतुकास्‍पद कामगिरीबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ व्‍यवस्‍थापनाचे अभिनंदन केले. विश्‍वास पाटील यांनी सांगितले की, संघाने दिवसाला २० लाख लिटर्स दूध संकलन व तितकीच विक्री करण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवलेले असून दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्‍वासार्हतेवर ते साध्‍य करू. या यशामध्‍ये दूध उत्‍पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे असल्‍यामुळे त्‍यांना संचालक मंडळाच्‍यावतीने धन्‍यवाद देतो, असे सांगत त्यांनी गोकुळ परिवाराच्या वतीने मुस्‍लीम बांधवांना ईदच्‍या शुभेच्‍छा दिल्या.