देशभरातील कोरोना लसीकरणाची तारीख ठरली…

0
78

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणास कधी सुरुवात होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना आता केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मोठी घोषणा केली आहे. देशभरात शनिवार दि. १६ पासून लसीकरणास प्रारंभ होणार असून सर्वप्रथम आरोग्य सेवकांना आणि सैनिक, कामगारांना ही लस दिली जाईल.

हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वर्षभराच्या आतच देशाने प्रतिबंधक लस विकसित केली आहे. ही लस सर्वात आधी डॉक्टर, नर्स यासारखे आरोग्य कर्मचारी, सैनिक यांना दिली जाणार आहे. अंदाजे 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या सहकारी गटाला लस दिली जाईल. यामध्ये तब्बल २७ कोटी नागरिकांचा समावेश असेल, अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे सीरमनं उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्स या दोन लसी देण्यात येईल.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, लसीकरणाची संपूर्ण तयारी राज्यात झाली आहे, ज्या क्षणाला केंद्र सरकार लसीची उपलब्धता करून देईल त्या क्षणी आम्ही लसीकरण सुरू करू. कोल्डचेनही तयार आहे, काही कमतरता आहे ती दूर करु. पहिल्या टप्प्यात ८ लाख आरोग्यसेवकांना लस देणार आहे.