मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट ; महागाई भत्त्यात वाढ..!

0 37

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिले आहे.  केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्र सरकारने पाच टक्क्यांनी घसघशीत वाढ केली आहे. १ जुलैपासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. आज (बुधवार) मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबरोबरच इतरही निर्णय घेण्यात आले. महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्यात आल्यानं सरकारी तिजोरीवर १६ हजार कोटींचा भार पडेल. मोदी सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा लाभ सध्या सेवेत असलेल्या ५० लाख कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती घेतलेल्या ६५ लाख कर्मचाऱ्यांना होईल, असे जावडेकर म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More