केंद्र सरकारकडून ‘जॉन्सन अँड जॉन्सन’निर्मित लसीच्या वापरास मंजुरी : एकच डोस पुरेसा !

0
99

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लसीकरणाचा वेग वाढवून कोरोना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. चार प्रकारच्या लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. आता जॉन्सन अँड जॉन्सन या बहुराष्ट्रीय औषध कंपनीने तयार केलेल्या लसीच्या वापरासाठी केंद्र सरकारने दिली आहे. विशेष म्हणजे इतर प्रकारच्या लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असताना जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा केवळ एकच डोस पुरेसा असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

भारताची लोकसंख्या सुमारे १३६ कोटी असून त्यापैकी सुमारे ५० कोटी लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. सध्या कोव्हिशील्ड कोव्हॅक्सिन, रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही, मॉडर्ना च्या साहाय्याने लसीकरण अभियान सुरू आहे. आता जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस व्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. मंत्री मांडविया यांनी ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘भारताच्या व्हॅक्सिन बास्केटचा विस्तार होत आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला मंजुरी देण्यात आली आहे. देशाकडे आता पाच EUA व्हॅक्सिन्स आहेत. यामुळे कोरोनाविरोधातील सामुहिक लढ्याला चालना मिळेल.