दऱ्याचे वडगाव येथे कृषिदिन उत्साहात साजरा…

0
18

दिंडनेली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्य कृषिदिन आणि कृषी संजीवनी सप्ताह सांगता समारंभ संपन्न झाला. यावेळी नाईक यांच्या फोटो पुजन आणि दिपप्रज्वलन विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोरोनामुळे मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना बी-बियाणे वाटप आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलरचे वाटप जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी परिसरातील विक्रमी सोयाबिन उत्पादक शेतकरी आणि सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा, कारली उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार रोपे देवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दऱ्याचे वडगावचे सरपंच अनिल मुळीक. बसवराज बिराजदार,  उमेश पाटील, प्राचार्य रामेती, डॉ. अशोकुमार पिसाळ, करवीर पं.स.चे  गटविकास अधिकारी जयवंत उगले आदी उपस्थित होते.