हुपरी येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा…

0
59

रांगोळी (प्रतिनिधी) : हुपरी येथे व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी संचलित बालमंदिर, विद्यामंदिर हुपरी, न्यु हायस्कूल हुपरीच्या वतीने आज जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. २१ जुन रोजी संपुर्ण जगात जागतिक योगदिन साजरा केला जातो.

यावेळी शाळा, महाविद्यालये, संस्था, शासकीय कार्यालयांमध्ये योगदिन साजरा करण्यात येतो. आज सकाळी हुपरी शाळेच्या आवारात सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी योगासनाचे धडे गिरवले. योग विद्या धाम हुपरी यांच्यावतीने संतोष शिंदे, पद्मजा पाटील, प्रसाद पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष घनश्याम आचार्य, सचिव सुनिल कल्याणी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.