फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांच्या मुलांचा सत्कार…

0
35

कोल्हापूर (प्रतिनिधी) : फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर नेहमीच दुसऱ्यांचे कौतुकाचे क्षण टीपण्याचे काम करत असतो. पण आज त्यांच्याच पाल्यांच्या कौतुकाचा आणि सत्काराचा क्षण टिपण्याचा सोहळा संपन्न झाला. नुकताच १० वी आणि १२ वी च्या परीक्षांचे निकाल जाहीर झाला. यामधे असोसिएशन मधील सदस्यांच्या मुलांनी चांगले गुण मिळवले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर अँड एडिटर असोसिएशन कोल्हापूरकडून आज सकाळी हॉटेल जोतिबा येथे सत्कार सोहळा आणि प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सायबर तज्ञ जयदीप मोरे उपस्थित होते.

यावेळी राहुल चिकोडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश गुरव यांनी असोसिएशनची स्थापना आणि वाटचालीबाबत माहिती दिली. तसेच जयदीप मोरे यांनी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांचे सोशल मीडिया आणि सायबर क्राईमबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी असोसिशनचे सेक्रेटरी सायलस मनपाडळेकर, संचालक अभिषेक शिवदास, प्रभात चौगुले, विनायक कुचगावे, संतोष जकाते, युवराज राऊत, सुरेश मोरे, सभासद उपस्थित होते.