‘सार्थक क्रिएशन्स’चा वर्धापनदिन उत्साहात…

0
57

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘सार्थक क्रिएशन्स’चा २१ वा वर्धापनदिन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी ‘दिल से रेहमान’ या शोच्या पोस्टरचे अनावरण शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याहस्ते करण्यात आले.

‘सार्थक क्रिएशन्स’साठी लवकरच नवीन मोठी जागा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन रविकिरण इंगवले यांनी दिले. तर सार्थक क्रिएशन्स’ महाडिक परिवाराचे अभिन्न अंग आहे. व त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही सदैव सोबत राहू, अशी   ग्वाही कृष्णराज महाडिक यांनी दिली.

यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, दि. न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, लक्ष्मी इंजिनिअरिंगचे पार्थ शहा, युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, शिवाजी विद्यापीठ कृती समितीचे डॉ. प्रवीण कोडोलीकर, नृत्य परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रत्नाकर शेळके आदी उपस्थित होते. अध्यक्ष निशांत कावणेकर यांनी आभार मानले.