साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यामध्ये सर्व गावात ७५ वा स्वतंत्र दिन उत्साहात पार पडला. यावेळी ठिकठिकाणी दानशूर व्यक्तींनी गरजू व्यक्तींना धान्याचे वाटप करत आपली सामाजिक बांधिलकी जपली.

यावेळी तालुक्यातील असळज बाजारपेठ येथे मोल-मजूरी करणाऱ्या गरीब आणि पुरग्रस्त कुटुंबांना कोल्हापूर जिल्हा वाहतूक सेनेचे प्रमुख दिनेश परमार, असळज बाजारपेठ अध्यक्ष बाळकृष्ण गावकर यांच्याकडून मोफत धान्याचे वाटप करण्यात आले. तसेच ‘मिशन संवेदना ‘ अंतर्गत तळये खुर्द येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत गगनबावडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रणजित पाटील यांच्या मार्फत १५ गरिब आणि गरजू कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी पोलिस कर्मचारी हिंदूराव पाटील, अनिल पाटील, सरपंच उज्वला पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.