‘यावेळी’ करा भाऊबीज साजरी..

0
308

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला दिवस म्हणजे भाऊबीज. हा दिवस बहिण – भावाच्या प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. दिवाळीच्या पाचव्या दिवशी हा सण येतो. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या सुखी, समृद्धी आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

यंदा १६ नोव्हेंबरला हा सण आला आहे. या दिवशी भावाला औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. दुपारी १ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून १८ मिनिटे हा शुभ मुहूर्त असणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्व निर्माण होते. त्यामुळे या दिवशी बहिणरूपी स्त्रीच्या सानिध्यात राहिल्याने, तिने बनवलेले पदार्थ खाल्ल्याने भावाला लाभ होतात, असे म्हटले जाते.