नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षा ४ मे पासून घेण्यात येणार असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केलं आहे. या परीक्षा १० जूनपर्यंत चालतील. १५ जुलैपर्यंत निकाल लागेल असंही त्यांनी सांगितलं. ‘एएनआय’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

शिक्षणमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितल्याप्रमाणे ‘सीबीएसई’च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखांची घोषणा आज (गुरुवार) ही घोषणा केली आहे. परीक्षेच्या तारखा समजल्याने सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरुन या तारखांची घोषणा केली आहे. याआधी जेव्हा जेव्हा त्यांनी सोशल मीडियावरुन संवाद साधला तेव्हा असे वाटले होते की ते परीक्षेच्या तारखा जाहीर करतील. मात्र त्यांनी आज तारखा जाहीर केल्या आहेत.