रोहित शर्माच्या दुखापतीची सीबीआय चौकशी करा..!  

0
58

मुंबई ( प्रतिनिधी) : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली  आहे. या दौऱ्यासाठी भारताचा सलामीवर खेळाडू रोहित शर्मा  याची निवड करण्यात आलेली  नाही. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर रोहितची निवड न झाल्याने सोशल मीडियावर एका चाहत्यांने आपली नाराजी व्यक्त करत  रोहितच्या दुखापतीची सीबीआयद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तर दुसरीकडे मुंबई विरूद्ध हैद्राबादच्या सामन्यात रोहित शर्मा मैदानावर उतरल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.  रोहित खेळला असल्याने तो पूर्णपणे तंदुरूस्त  झाल्याचे स्पष्ट होत आहे. रोहितचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात समावेश न केल्याने बीसीसीआयमध्ये रोहितबाबत राजकारण केले जात आहे का ? असा प्रश्नही क्रीडा विश्वातून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, रोहितला दौऱ्यातून वगळण्यात आल्याने  भारताचे माजी क्रिकेटपट्टू सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर,  माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग यांनी देखील सवाल उपस्थित केला आहे.