नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी सीबाआयने देशभरात मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने २०राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५६ ठिकाणी छापे टाकले आहेत. सिंगापूर आणि न्यूझीलंडच्या इंटरपोल युनिटने जारी केलेल्या इनपुटच्या आधारे सीबीआयने ही छापेमारी केली आहे.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा अनेक गँग समोर आल्या आहेत, ज्या केवळ चाईल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित सामग्रीचाच नव्हे तर लहान मुलांचाही व्यापार करतात. त्यांना फिजिकली ब्लॅकमेल करतात. या गँग अशाचप्रकारे काम करत होत्या. गेल्या वर्षी देखील या संदर्भात एक ऑपरेशन करण्यात राबवण्यात आले होते, ज्याला ‘ऑपरेशन कार्बन’ असे नाव देण्यात आले हेते.

भारतातील सोशल मीडिया साइट्सवर ही आज चाइल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ आणि मजकूर अपलोड होत आहे. ज्यावर सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सुप्रीम कोर्टाने सोशल मीडिया कंपन्यांकडून उत्तर मागवली आहेत. १९ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने सोशल मीडिया कंपन्यांना सोशल मीडियावर चाईल्ड पोर्नोग्राफी आणि रेपचे व्हिडीओ अपलोड करण्यापासून रोखण्यासाठी काय पावले उचलली आहेत, याबद्दल विचारले होते. यासोबतच स सुप्रीम कोर्टाने फेसबुक, ट्विटरसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांना ६ आठवड्यात अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

गेल्या वर्षी चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयने देशातील १४ राज्यांमधील ७७ ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणी सीबीआयने विविध शहरांतून ७ जणांना अटक केली होती. सीबीआयच्या रडारवर ५० हून अधिक व्हॉट्सअॅप ग्रुप होते. ज्यामध्ये ५ हजारहून अधिक लोकांची नावे समोर आली होती. जे या प्रकरणाशी संबंधित सामग्री सोशल मीडियावर शेअर करत होते. याच भागात सीबीआयने हा छापा टाकला आहे.