मुंबई (प्रतिनिधी) : देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असतानाच चिंता वाढविणारी बातमी आली आहे. ब्रिटनमध्ये तयार झालेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा आता भारतामध्येही झपाट्याने संसर्ग होत असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटनमधून देशात परतलेल्या नागरिकांपैकी २० जणांना या विषाणूची लागण झाली आहे. यापैकी ८ रूग्ण दिल्लीमधील आहेत. त्यामुळे प्रशासनाने धास्ती घेतली आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये २ वर्षांच्या मुलीला मंगळवारी या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. ब्रिटनमधून आलेल्या सर्व नागरिकांची जीनोम सिक्वेन्सिंग च्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये १४, कोलकाता जवळच्या कल्याणीमध्ये ७, पुणे येथे ५० निमहंसमध्ये १५, यासह एकूण १०७ सॅम्पलची तपासणी कऱण्यात आली. यात दिल्लीमध्ये ८ कोलकाता जवळच्या कल्याणीमध्ये १ निमहंसमध्ये २, पुणे येथे ७ आणि अन्य दोन लॅबमध्ये २ जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.