शिवाजी विद्यापीठात इंदिरा गांधी यांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात आज (शनिवारी) भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अहिंसा व एकतेची शपथ घेण्यात आली. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा… Continue reading शिवाजी विद्यापीठात इंदिरा गांधी यांना अभिवादन

सांबरसदृश प्राण्याच्या मांस वाहतूक प्रकरणी दोघांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथे सांबरसदृश प्राण्याचे मांस वाहतूक केल्याप्रकरणी पोलिस व वनविभागाने संयुक्तरीत्या कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या. शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून स्नॅपर रायफलही ताब्यात घेण्यात आली आहे. शहा सैफुद्दीन शमशुद्दीन (रा. बेंगळुुरू) व चेतन कुमार सुभाष चंद्र अभिगिरी (रा. गदग) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. तुडीये-कोलिक रोडवर पोलिस निरीक्षक संतोष… Continue reading सांबरसदृश प्राण्याच्या मांस वाहतूक प्रकरणी दोघांना अटक

सौर कृषी वाहिनी योजनेसाठी भाडेतत्वावर जमीन घेणार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषी वीज वाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे. अशा कृषी वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या जमिनी प्रति वर्ष ७५ हजार रुपये प्रति हेक्टर या दराने भाडेतत्वावर महावितरणद्वारे घेण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ३ हजार कृषी वाहिन्यांचे… Continue reading सौर कृषी वाहिनी योजनेसाठी भाडेतत्वावर जमीन घेणार

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी अर्ज करावेत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना ‘राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल’बाबतची माहिती व्हावी, यासाठी जास्तीत-जास्त पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी संबंधित वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाजकल्याण  विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे. राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्य स्तरावर… Continue reading तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी अर्ज करावेत

पिंपळगाव खुर्दने ग्रा.पं. निवडणुकीच्या विजयाचे महाद्वार उघडले : मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : पहिल्या टप्प्यात जाहीर झालेल्या ग्रा.पं. पैकी कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्दच्या ग्रामस्थांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून राष्ट्रवादीला पाठबळ दिले. या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकांच्या विजयाचे महाद्वार उघडले आहे, असे गौरवोद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले. पिंपळगाव खुर्द ता. कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकनियुक्त सरपंच शीतल नवाळे यांच्यासह उपसरपंच सदाशिव चौगुले व पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात… Continue reading पिंपळगाव खुर्दने ग्रा.पं. निवडणुकीच्या विजयाचे महाद्वार उघडले : मुश्रीफ

सर्व गड-किल्ले अतिक्रमणमुक्त करावेत : नितीन शिंदे

पुणे (प्रतिनिधी) : प्रतापगडाच्या पायथ्याला असणारे अतिक्रमण हटवले, त्याप्रमाणे सरकारने महाराष्ट्रातील अन्य गड-किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून अतिक्रमणमुक्त करावे आणि या सर्व गड-किल्ल्यांना पूर्वीचे गतवैभव प्राप्त करुन द्यावे, अशी मागणी माजी आमदार आणि ‘शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक नितीन शिंदे यांनी केली. ते हिंदू जनजागृती समिती आयोजित ‘प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त’ अन्य किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामांचे… Continue reading सर्व गड-किल्ले अतिक्रमणमुक्त करावेत : नितीन शिंदे

पाक पंतप्रधानांनी भारतीय संघाची उडवली खिल्ली

लाहोर (वृत्तसंस्था) : टी-२० वर्ल्डकपमध्ये गुरुवारी उपांत्य फेरीमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झाला. इंग्लंडकडून भारताचा १० गडी राखून पराभव झाल्यामुळे भारत या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. या मानहानीकारक पराभवाने भारतावर चाहते संतापले असून, सर्वस्तरातून भारतावर टीका सुरू आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनीही ट्विट करत भारताची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्विट करत भारताला… Continue reading पाक पंतप्रधानांनी भारतीय संघाची उडवली खिल्ली

गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी बायोगॅस योजना : विश्वास पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एन.डी.डी.बी (मृदा), जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व सिस्टीमा कंपनी यांच्या संयुक्त सहकार्यातून गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी कार्बन क्रेडिट योजने अंतर्गत ५००० बायोगॅस प्लान्टची उभारणी करण्यात येणार आहे. कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेमध्ये दूध उत्पादक महिलांना, धूर  धूळ विरहीत इंधन घरच्या घरी तयार करता यावे. शेण वाहून नेणे, शेणी लावणे या कामातून महिलांना सुटका… Continue reading गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी बायोगॅस योजना : विश्वास पाटील

आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांना आज (शुक्रवारी) जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली. आज दुपारी एक  वाजता मला वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ… Continue reading आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक

रेशनवरील गहू वाढवून देण्याची मागणी

पेठवडगाव (प्रतिनिधी) : शासनाने रेशन दुकानातून देण्यात येणाऱ्या गव्हाच्या प्रमाणात कपात केल्यामुळे गोरगरिबांवर अन्याय झाला असून, गव्हाच्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी होत आहे. रेशन दुकानातून प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना मोफत धान्य देण्यात येते. यामध्ये प्रति रेशनकार्ड तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ दिला जात होता; परंतु जुलै महिन्यापासून शासनाने गव्हाच्या प्रमाणात कपात केली असून, सध्या… Continue reading रेशनवरील गहू वाढवून देण्याची मागणी

error: Content is protected !!