रविवार असल्याने नकारात्मक माहिती शेअर करणार नव्हतो पण…: चंद्रकांत पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती, अशा मजकुराचे ट्विट करत   भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारसह सर्वांचे लक्ष एका   महत्त्वाच्या विषयाकडे वेधले आहे. गेल्या वर्षभरात राज्यात झालेल्या महिला अत्याचारांच्या घटनांची यादी ‘महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी’ अशा मथळ्याखाली या ट्विटमध्ये पाटील यांनी दिली आहे. चंद्रकांत… Continue reading रविवार असल्याने नकारात्मक माहिती शेअर करणार नव्हतो पण…: चंद्रकांत पाटील

सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

बारामती (प्रतिनिधी) : मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण स्थानिक आहे. मी त्यावर जास्त… Continue reading सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

सचिन वाझेंनंतर आता ठाण्यातील नेत्याची चौकशी होणार ?

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई केली. दरम्यान, आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. या नेत्याचे आणि सचिन वाझे यांचे… Continue reading सचिन वाझेंनंतर आता ठाण्यातील नेत्याची चौकशी होणार ?

सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात १९ मार्चला राज्यभर रास्तारोको : राजू शेट्टी

महावितरणने सुरू केलेल्या सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात राज्यभरात १९ मार्चला रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

गडहिंग्लजमध्ये शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बेळगाव महापालिकेचे उपमहापौर प्रकाश शिरोळकर  यांच्या वाहनाच्या मराठी नंबरप्लेटवर काही कानडी लोकांनी काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. तसेच भगव्या ध्वजाची मोडतोड करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ गडहिंग्लज शिवसेनेच्या वतीने दसरा चौकात कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आज (शनिवार) निषेध व्यक्त करण्यात आला.   यावेळी शहर प्रमुख अशोक शिंदे, संजय संकपाळ, सुरेश… Continue reading गडहिंग्लजमध्ये शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध

रेखा जरे खूनप्रकरण : अखेर पत्रकार बाळ बोठे याला अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अटक करण्यात आली आहे. आज (शनिवार) पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादमधून ताब्यात घेतले .  मागील तीन महिन्यांपासून बोठे  याच्या मागावर पोलीस होते. पण तो गुंगारा देत होता. अखेर  त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पाच… Continue reading रेखा जरे खूनप्रकरण : अखेर पत्रकार बाळ बोठे याला अटक

महिला सबलीकरणासाठी शिवसेना-भगिनी मंच सदैव तत्पर : वैशाली क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महिलांच्या सबलीकरणासाठी शिवसेना आणि भगिनी मंच नेहमीच एक पाऊल पुढे असतो. त्यामुळे येणाऱ्या काळातही लेक वाचवा, लेक शिकवा अभियानातून महिलांच्या सबलीकरणाचे कार्य अविरत सुरु ठेवणार आहे. महिला सबलीकरणासाठी शिवसेना आणि भगिनी मंच सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी केले. त्या महिला दिनानिमित्त आज (सोमवार) बोलत होत्या.… Continue reading महिला सबलीकरणासाठी शिवसेना-भगिनी मंच सदैव तत्पर : वैशाली क्षीरसागर

कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ४७ जणांचा डिस्चार्ज, एकाचा मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत ३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) दिवसभरात ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ७०७ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.   कोल्हापूर शहरातील २०, गडहिंग्लज तालुक्यातील ४, हातकणंगले तालुक्यातील आणि करवीर तालुक्यातील प्रत्येकी ३, कागल तालुक्यातील १ तर इतर जिल्ह्यातील ३… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ४७ जणांचा डिस्चार्ज, एकाचा मृत्यू…

कोल्हापुरात एक टन कचरा, प्लास्टिक गोळा

कोल्हापूर (प्रतिनिधी): शहरातील विविध ठिकाणी राबवलेल्या महास्वच्छता अभियानात एक टन कचरा, प्लास्टिक गोळा करण्यात आला. मोहिमेचा ९६ वा रविवार होता. शेंडापार्क ते एसएससी बोर्ड, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी मेनरोड, खानविलकर पंप ते रमनमळा चौक, दसरा चौक ते खानविलकर पंप, टेंबलाईवाडी ब्रिज, लिशा हॉटेल चौक ते कावळा नाका परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वरा फौंडेशनच्यावतीने रंकाळा परिसरात… Continue reading कोल्हापुरात एक टन कचरा, प्लास्टिक गोळा

यड्राव येथील जुगार अड्यावर छापा

इचलकरंजी (प्रतिनिधी): यड्राव येथील पार्वती इंडस्ट्रीजमध्ये असणाऱ्या हॉटेल अॅकॅाडेवर तीनपानी जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांचा छापा टाकला. या कारवाईत तीन चाकी वाहने, ६ मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम ३,२४८०० रूपये असे एकूण २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष गोपाल शेट्टी (वय ५३ रा. इचलकरंजी), विनोद चव्हाण (वय ४९ रा. सांगली), नासीर नदाफ (वय ४८… Continue reading यड्राव येथील जुगार अड्यावर छापा

error: Content is protected !!