पोलिसांवर ‘वरून’ दबाव येतोय : सुप्रिया सुळे

मुंबई (प्रतिनिधी) : जितेंद्र आव्हाड लढवय्ये नेते आहेत. त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले आहे. त्यानंतर समजले की त्यांच्या अटकेसाठी ‘वरुन’ दबाव आहे. वरुन दबाव आहे म्हणजे कुठून हे मला माहिती नाही. मी कुणावरही आरोप करत नाही. पोलिसांवर दबाव येतोय. यात त्या बिचाऱ्यांची काहीच चूक नाही. मी सत्तेत असो वा नसो मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान… Continue reading पोलिसांवर ‘वरून’ दबाव येतोय : सुप्रिया सुळे

सानिया मिर्झा-शोएब मलिक होणार विभक्त

दुबई (वृत्तसंस्था) : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असून, दोघे घटस्फोट घेणार असल्याचे आता निश्चित  झाले आहे. त्यांचा १२  वर्षांचा सुखी संसार मोडला आहे; मात्र सानिया मिर्झ आणि शोएब मलिककडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सानिया… Continue reading सानिया मिर्झा-शोएब मलिक होणार विभक्त

चंद्रकांतदादांनी घेतले दोन अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व!

पुणे (प्रतिनिधी) : राजकारणाचा स्तर आणि राजकीय वारे बेबंद दिशेने वाहत असलेल्या आजच्या जमान्यात आपली सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलता जतन करणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांचे नाव घ्यावे लागेल. याचा प्रत्यय पुण्यात घडलेल्या एका घटनेने आला. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या लेकरांच्या पालनपोषणासाठी कष्ट उपसणाऱ्या आजीवरही अर्धांगवायूच्या झटक्याने घाला घातला. आता ती लेकरे पुन्हा उघड्यावर पडणार असे… Continue reading चंद्रकांतदादांनी घेतले दोन अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व!

पुण्यात मांजर पाळण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक

पुणे (प्रतिनिधी) : ‘पुणे तिथे काय उणे’ हे आपण कायम ऐकतो. पुणेकर कधी काय करतील याचाही काही नेम नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पुण्याची नेहमीच चर्चा होत असते. पुणेकरांचे तिरकसं बोलणे आणि पुणेकरांचा मदत करण्याचा स्वभाव या कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणे नेहमीच चर्चेत असते. आज पुन्हा चर्चेत आले ते घरात मांजर पाळण्यासाठी पुणे महापालिकेचा… Continue reading पुण्यात मांजर पाळण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक

कोरोनसोबतच डेंग्यूही बळावतोय

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूच्या संसर्ग अद्याप कायम आहे. कोरोनाचे विषाणू नवीनवीन व्हेरियंट समोर येताना दिसत आहेत. त्यातच आता गुलाबी थंडीचा चाहूल लागली असताना आता डेंग्यूसारखे विषाणूजन्य आजार बळावताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढली आहे. एकीकडे कोरोना विषाणू अधिक धोकादायक बनत आहे, तर दुसरीकडे डेंग्यूसारखा व्हायरल आजार डोके वर काढत आहेत. अशावेळी लोकांना… Continue reading कोरोनसोबतच डेंग्यूही बळावतोय

शेतकऱ्याने ग्रामपंचायतीसमोरच बांधला बैल

पेठवडगाव (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे वनविभागाने शेतात जाण्याचा रस्ता बंद केल्यामुळे एका शेतकऱ्याने आपला बैल ग्रामपंचायतीसमोर बांधून त्याच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. कासारवाडी येथे शेत शिवारात जाणारे रस्ते वनविभागाने बंद केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामासाठी तसेच वैरण आणण्यासाठी अडचण होत आहे. कासरवाडी येथे क्रशर उद्योग मोठ्या प्रमाणावर असून, वनविभागाने या उद्योगाकडे… Continue reading शेतकऱ्याने ग्रामपंचायतीसमोरच बांधला बैल

अतिक्रमणधारकांच्या पाठीशी पुरोगामी संघर्ष परिषद खंबीरपणे उभी : साबेरा इंगळे

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : सरकारी व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही गतिमान होत आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो नागरिक बेघर होणार असून त्यांच्या निवाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यानी आवाज उठवला आहे. त्यांनी प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला असल्याची माहीती पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शिरोळ तालुकाध्यक्षा साबेरा… Continue reading अतिक्रमणधारकांच्या पाठीशी पुरोगामी संघर्ष परिषद खंबीरपणे उभी : साबेरा इंगळे

ग्रामीण भागातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना दिलासा द्यावा : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात गायरान जमिनीवर वर्षानुवर्षे असलेल्या अतिक्रमणांबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिक्रमणे दूर करून या गायरान जमिनी मोकळ्या कराव्यात. अशा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, असे झाल्यास सामाजिक व्यवस्था आणि जनसामान्यांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सरकारनेच ग्रामीण भागात गायरानामध्ये झालेली अतिक्रमणे कायम करण्याबाबत कायदा आणावा असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील… Continue reading ग्रामीण भागातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना दिलासा द्यावा : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

महाराष्ट्र राज्य सह. साखर कारखाना संघाच्या संचालकपदी सुहासिनीदेवी घाटगे…

कागल (प्रतिनिधी) : राज्याच्या साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.मुंबई या संस्थेच्या संचालकपदी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली. राज्य सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची २०२२ – २३ ते २०२६ – २७ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये महिला राखीव मतदार संघातून श्रीमती… Continue reading महाराष्ट्र राज्य सह. साखर कारखाना संघाच्या संचालकपदी सुहासिनीदेवी घाटगे…

गायरानमधील अतिक्रमणधारकांना सरकारने दिलासा द्यावा : आ. यड्रावकर

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात गायरान जमिनीवर वर्षानुवर्षे असलेल्या अतिक्रमणांबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिक्रमणे दूर करून या गायरान जमिनी मोकळ्या करून घ्याव्यात यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत, परंतु असे झाल्यास सामाजिक व्यवस्था आणि जनसामान्यांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. ग्रामीण भागात गायरान जमिनीवरील जेथे घरांसाठी अतिक्रमण झाली आहेत, अशा नागरिकांना त्यांचे त्या ठिकाणचे अस्तित्व… Continue reading गायरानमधील अतिक्रमणधारकांना सरकारने दिलासा द्यावा : आ. यड्रावकर

error: Content is protected !!