‘गोकुळ’च्‍या ३२ सेवानिवृत्‍त कर्मचाऱ्यांचा सत्कार  

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : प्रतिकूल परिस्थितीत काम करून गोकुळला यशाच्‍या शिखरावर पोहचविण्‍यात मोलाचा वाटा असणारे कर्मचारी सेवेतून निवृत्‍त होत आहेत. त्याची मनाला खंत वाटत आहे. पण नियमानुसार कार्यकाल पूर्ण झाल्‍यानंतर सर्वांनाच सेवानिवृत्‍त व्‍हावे लागते. कर्मचा-यांच्‍या कष्‍टाची जाणीव गोकुळ नेहमीच ठेवेल, असे प्रतिपादन माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक अरूण नरके यांनी केले. गोकुळच्या सेवानिवृत्‍त कर्मचा-यांच्‍या सत्‍कार प्रसंगी… Continue reading ‘गोकुळ’च्‍या ३२ सेवानिवृत्‍त कर्मचाऱ्यांचा सत्कार  

गगनबावडा तालुक्यात हुल्लडबाज पर्यटकांचा धुडगूस    

साळवण (प्रतिनिधी) : नैसर्गिक वैविध्याने नटलेल्या गगनबावडा तालुक्यात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. वीक एंडला तालुक्यातील चार लघुपाटबंधारे प्रकल्पावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. परंतु काही हुल्लडबाज पर्यटकांच्या गैरप्रकाराचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यातच पोलिसांचा वचक न राहिल्याने पर्यटनस्थळावरील शांतता धोक्यात आली असून अशा पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होऊ… Continue reading गगनबावडा तालुक्यात हुल्लडबाज पर्यटकांचा धुडगूस    

श्रीनगर येथे जळगावचा सुपूत्र यश देशमुख शहीद

जळगाव (प्रतिनिधी) :  श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर केलेल्या हल्ल्यात जळगांव जिल्ह्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख शहीद झाले. या हल्ल्यात भारताच्या दोन जवानांना वीरमरण  आले. श्रीनगर जवळील एचएमटी येथे गुरूवारी (दि.२६) दुपारी  गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी सैन्य दलाच्या तुकडीवर भ्याड हल्ला केला. २१ व्या वर्षी प्रशिक्षण झाल्यानंतर यश देशमुख यांची गेल्या सात… Continue reading श्रीनगर येथे जळगावचा सुपूत्र यश देशमुख शहीद

कळे येथे बांधकाम कामगार, आशा गटप्रवर्तकांचे आंदोलन…

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यातील बांधकाम कामगार आणि आशा वर्कर गटप्रवर्तक यांनी कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दस्तुर चौक, कळे येथे आपल्या विविध मागण्यांसाठी  आंदोलन केले. यावेळी कामगारांना गुलाम बनविणाऱ्या कामगार संहिता रद्द करा, शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालणारे कायदे रद्द करा, बांधकाम कामगारांची मेडीक्लेम योजना सुरू करा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा, व आशा, गटप्रवर्तक… Continue reading कळे येथे बांधकाम कामगार, आशा गटप्रवर्तकांचे आंदोलन…

कोल्हापूर युवासेनेच्या वतीने शहिदांना आदरांजली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर युवासेना जिल्ह्याच्या वतीने 26/11 च्या भ्याड हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान आणि भारतीय नागरिकांना कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक इथे आज (गुरुवार) आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेना चित्रपटसेना कार्याध्यक्ष सुशांत शेलार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नूतन अध्यक्ष धनाजी यमकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सुहास पोवार, उपशहरप्रमुख सनराज… Continue reading कोल्हापूर युवासेनेच्या वतीने शहिदांना आदरांजली…

‘आप’च्या वतीने छ. शिवाजी चौकात संविधानाचे वाचन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने छ. शिवाजी चौकात आज (गुरुवार) संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी संविधानाचे मूल्य रुजविण्यासाठी ‘आप’ कटिबद्ध असल्याचे पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी यावेळी सांगितले. 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, संतोष… Continue reading ‘आप’च्या वतीने छ. शिवाजी चौकात संविधानाचे वाचन…

वीज बिल भरू नका..! : राज ठाकरेंचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : वाढीव वीज बिलाविरोधातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला आहे. मुंबईतील मोर्चावेळी ‘वीज बिल भरु नका’, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे जोपर्यंत वीज बिल भरा म्हणून सांगत नाहीत, तोपर्यंत एकाही वीज ग्राहकाने वीज बिल भरु नये. जर का कोणी तुमचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी… Continue reading वीज बिल भरू नका..! : राज ठाकरेंचे आवाहन

म्हसवे येथे पुस्तके भेट देऊन मुलाच्या स्मृती जागवल्या

गारगोटी (प्रतिनिधी) : घरात अठरा विश्व दारिद्र्य.. रात्रंदिवस अभ्यास करून एमपीएससी पास व्हायचे आणि मोठा अधिकारी बनायचे, हेच त्याचे ध्येय. त्या दिशेने तो राबला. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न त्याच्या अकाली निधनाने अधुरेच राहिले. मात्र, मुलाचे अधुरे राहिलेले स्वप्न गावातील मुलांनी अधिकारी बनून साकारावे, यासाठी वडिलांनी गावातील अभ्यास केंद्राला पुस्तके भेट… Continue reading म्हसवे येथे पुस्तके भेट देऊन मुलाच्या स्मृती जागवल्या

बीडशेड येथे केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात रास्ता रोको

सावरवाडी (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावेत, शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न सोडवावेत या तसेच इतर मागण्यांसाठी केंद्र शासनाच्या विरोधी भारत बंद आंदोलनाचा एक भाग म्हणून बीडशेड (ता. करवीर) येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे आज (गुरुवारी) सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्य चौकात सकाळी १०… Continue reading बीडशेड येथे केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात रास्ता रोको

भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. आंबेडकर मध्यवर्ती जयंती कमिटीच्या वतीने रॅली (व्हिडिओ)

आज २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती कमिटीच्या वतीने शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली.  

error: Content is protected !!