यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा : संदीप कोळेकर यांचे आवाहन

शिंगणापूर (प्रतिनिधी) :  कोरोनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आनंदात साजरा करण्यासाठी तो साधेपणाने  साजरा करण्याचे आवाहन करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यानी केले. ते गणेशोत्सव नियोजन बैठकीत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बालिंगेचे सरपंच मयूर जांभळे होते. या बैठकीसाठी बालिंगे, नागदेववाडी, पाडळी खुर्द, दोनवडे, फुलेवाडी, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जीवबा नानापार्क… Continue reading यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा : संदीप कोळेकर यांचे आवाहन

राष्ट्रीय मानवाधिकार पन्हाळा तालुका उपाध्यक्षपदी सचिन सुतार  

कळे (प्रतिनिधी) : सावर्डे तर्फ असंडोली (ता.पन्हाळा) येथील सचिन नामदेव सुतार यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पन्हाळा तालुका उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड  करण्यात आली. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य  उपाध्यक्ष संजय पाटील यांनी सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कामिनी पाटील,  विभाग प्रमुख प्रकाश चौगुले, जिल्हा कार्याध्यक्ष जोतीराम पोर्लेकर,  जिल्हा… Continue reading राष्ट्रीय मानवाधिकार पन्हाळा तालुका उपाध्यक्षपदी सचिन सुतार  

रांगोळी येथे ‘पोषण महा’चे उद्घाटन 

रांगोळी (प्रतिनिधी) : पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार कुपोषणमुक्त भारत निर्माण व्हावा, यासाठी दर वर्षी सप्टेंबर महिना ‘पोषण महा’ म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने रांगोळी येथे एकात्मिक बाल विकास योजने (अंगणवाडी) अंतर्गत  आज (सोमवार) ‘पोषण महा’चे उद्घाटन करण्यात आले. पुढील महिनाभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यावेळी पोषण आहार कशा पद्धतीने दिला पाहिजे. सुदृढ… Continue reading रांगोळी येथे ‘पोषण महा’चे उद्घाटन 

राज्यातील जलतरण तलाव सुरु करा, अन्यथा… : नागरी कृती समितीचा इशारा  

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली राज्यातील जलतरण तलाव पुन्हा खेळाडूंच्या सरावासाठी सुरु करण्याची मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने   करण्यात आली  आहे. याबाबतचे निवेदन कृती  समितीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेलद्वारे पाठवले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून क्रीडा संकुले व खेळांच्या… Continue reading राज्यातील जलतरण तलाव सुरु करा, अन्यथा… : नागरी कृती समितीचा इशारा  

कोल्हापुरात काल रात्री भूकंपाचे सौम्य धक्के : तीव्रता ३.९ रिश्टर स्केल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात काल (शनिवार) रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूरपासून १९ किलोमीटर कळे आणि पणुत्रेच्यामध्ये असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिली आहे. कोल्हापुरात काल रात्री सौम्य भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी भूकंपाचा धक्का… Continue reading कोल्हापुरात काल रात्री भूकंपाचे सौम्य धक्के : तीव्रता ३.९ रिश्टर स्केल

कोलोलीतील भैरव सेवा संस्थेचे ११७ सभासद रद्द

कोतोली (प्रतिनिधी) : कोलोली (ता. पन्हाळा) येथील भैरव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे ११७ सभासद अपात्र असल्याचे आदेश सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी दिल्याची माहिती अॅड. अमोल पाटील यांनी दिली. यामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे.   संस्थेचे सभासद मुरारी तुकाराम पाटील यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पन्हाळा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. संस्थेच्या सत्तारूढ… Continue reading कोलोलीतील भैरव सेवा संस्थेचे ११७ सभासद रद्द

मेघोली दुर्घटना : नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यास शेतकऱ्यांचा विरोध

कडगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, महसुल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करत असताना शेतकऱ्यांनी विरोध केला. शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी असेल, तर ती स्वीकारणार नाही. योग्य मोबदला मिळणार असेल, तरच पंचनामे करा, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी आज (शनिवार) खासदार, आमदार, अधिकारी यांच्यासमोर घेतला. … Continue reading मेघोली दुर्घटना : नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यास शेतकऱ्यांचा विरोध

पालकमंत्र्यांकडून मेघोली धरणस्थळाची पाहणी   

कडगाव (प्रतिनिधी ) :  भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (शनिवार) सकाळी मेघोली धरणाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, धरण फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एक महिला मृत्युमुखी पडली आहे. तर काही जनावरे वाहून गेली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने… Continue reading पालकमंत्र्यांकडून मेघोली धरणस्थळाची पाहणी   

१५ टक्के शैक्षणिक फी माफी आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून नागरिकांचे आर्थिक  गणित विस्कळीत झाल्याने राज्य शासनाने शालेय शैक्षणिक फीमध्ये १५ टक्के माफीचे आदेश काढले आहेत. परंतु, याची अंमलबजावणी प्रत्यक्षात कोणत्याही शाळेमध्ये होत नसल्याने पालकांची आर्थिक कुचबंणा होत आहे. तरी तत्काळ या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी आज (शुक्रवार) कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली. याबाबतचे निवेदन… Continue reading १५ टक्के शैक्षणिक फी माफी आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी  

नुकसान भरपाई, अनुदान देण्यासाठी शासन कोणता मुहूर्त बघत आहे ? : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : महापुराने झालेल्या नुकसानीची भरपाई व दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयाचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यासाठी महाविकास आघाडीचे शासन कोणता मुहूर्त बघत आहे ? असा उपरोधिक सवाल शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हा अध्यक्ष  समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. गौरी-गणपती, दसरा व दिवाळी सणाच्या तोंडावर कोरोना… Continue reading नुकसान भरपाई, अनुदान देण्यासाठी शासन कोणता मुहूर्त बघत आहे ? : समरजितसिंह घाटगे

error: Content is protected !!