मौजे वडगांव गावातील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार…

टोप (प्रतिनिधी) : मौजे वडगांव गावातील स्मशानभूमीत काही अज्ञातांनी लाल दोऱ्याने, लाल कापडात काळ्या बाहुलीला गुंडाळून बाहूलीत लिंबूवातून मोळे मारून लिंबू , नारळ, हळद कुंकू स्मशानात विस्कटुन भानामतीचा प्रकार केल्याने गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे. हा प्रकार गावातील राजकीय सत्ता संघर्षातून की अन्य अघोरी प्रकारासाठी केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, असाच प्रकार मागील… Continue reading मौजे वडगांव गावातील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार…

एखादा बळी देऊनच ठेकेदार पादचारी उड्डाण पूलाचे काम सुरू करणार का..? : प्रतिज्ञा उत्तुरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील सीबीएस स्टँड ते राजारापुरी या मार्गावर पायी ये-जा करण्यासाठी पर्याय नाही. त्याचा विचार करून पादचारी उड्डाण पूलासाठी (फूट ओव्हर ब्रीज) ३ कोटी ८२ लाख निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ९ मार्चला कामाचे भुमिपूजनही झाले. मात्र, एक महिना उलटला तरीही अद्याप कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे एखादा बळी… Continue reading एखादा बळी देऊनच ठेकेदार पादचारी उड्डाण पूलाचे काम सुरू करणार का..? : प्रतिज्ञा उत्तुरे

कागलच्या ‘त्या’ कार्यकर्त्याच्या कृतीने ना. हसन मुश्रीफ झाले भावुक…

कागल (प्रतिनिधी) : कागल येथील सागर दावणे या कार्यकर्त्यांने आपल्या रक्ताने साकारलेले चित्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्या कार्यकर्त्यांचे आपल्यावरील जिवापाड प्रेम पाहून ना. मुश्रीफही भावूक झाले. यावेळी ना. मुश्रीफ म्हणाले, कार्यकर्त्यांचे स्थान नेहमीच माझ्या हृदयात राहिलेले आहे. जीवाला जीव देणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच अनेक आव्हाने सहज पार करत आलो… Continue reading कागलच्या ‘त्या’ कार्यकर्त्याच्या कृतीने ना. हसन मुश्रीफ झाले भावुक…

गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक : दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूधाची विक्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळच्या दुधाने आज (गुरुवार) रमजान ईदा दिवशी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून आज २२ लाख ३१ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली ही सर्वाधिक दूध विक्री आहे. या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा… Continue reading गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक : दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूधाची विक्री

पालकमंत्र्यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करू : बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गोरगरिबांचे नेते आहेत. त्यांचा वाढदिवस तिथीनुसार बुधवारी दि. १७ म्हणजेच श्री. रामनवमी दिवशी होत आहे. सबंध जिल्हाभर हा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी केले. पाटील म्हणाले की, पालकमंत्री मुश्रीफ यांनी गेल्या ३५-४० वर्षांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्ची… Continue reading पालकमंत्र्यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करू : बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर

गीता पाठक यांना हिरकणी पुरस्कार प्रदान..!

टोप (प्रतिनिधी) : कराड येथील गीता व्यसन मुक्ती संस्थेच्या प्रमुख आणि सिने अभिनेत्री गीता पाठक यांना सोनाई इंटरप्राइजेसच्या वतीने हिरकणी पुरस्कार संजय जाधव, आनंदराव साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रामध्ये सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीना प्रोत्साहन देण्यासाठी संजय जाधव हे गेली अनेक वर्षे काम करत आहेत. गीता व्यसन मुक्ती संस्थेच्या प्रमुख गीता पाठक… Continue reading गीता पाठक यांना हिरकणी पुरस्कार प्रदान..!

वाहन उद्योग क्षेत्रामध्ये ‘आयटी’ला प्रचंड संधी : रमेश मिरजे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाहन उद्योग क्षेत्र प्रचंड मोठ्या स्थित्यंतरामधून जात आहे. इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहने, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंटरनेट ऑफ थिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर वाहन क्षेत्रामध्ये होत आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या कक्षा अतिशय रुंदावत असून त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला प्रचंड मोठी संधी उपलब्ध आहे असे मत निसान डिजिटल… Continue reading वाहन उद्योग क्षेत्रामध्ये ‘आयटी’ला प्रचंड संधी : रमेश मिरजे

मोरेवाडी ग्रामपंचायत ई-ग्रामस्वराजमध्ये राज्यात प्रथम…

कळे (प्रतिनिधी) : मोरेवाडी (ता.पन्हाळा) ग्रामपंचायतीने सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात १०० टक्के करवसुली करुन त्यातून आर्थिक बाबींची १५ मार्च पूर्वी अंमलबजावणी केली. यातून या ग्रामपंचायतीने यावर्षी ई-ग्राम स्वराजमध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. मोरेवाडी ग्रामपंचायतीने नागरिकांकडून पाणीपट्टी, घरफाळा, दिवाबत्ती अशा विविध करांची १०० टक्के कर वसूली केली. गेल्या १८ वर्षांपासून ग्रामपंचायतीने १०० टक्के करवसुली… Continue reading मोरेवाडी ग्रामपंचायत ई-ग्रामस्वराजमध्ये राज्यात प्रथम…

बाळूमामा भंडारा उत्सवात कृष्णात डोणे यांची भाकणूक…

कपिलेश्वर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र,गोवा, राजस्थान,कोकण आणि अन्य राज्यातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात जागरा दिवशी पहाटे कृष्णात डोणे यांनी केलेली भाकणूक केली. श्री क्ष्रेत्र आदमापूर येथे सदगुरू बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेत जागरा दिवशी पहाटे ही भाकणुक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी ही भविष्यवाणी कथन केली. या मराठी… Continue reading बाळूमामा भंडारा उत्सवात कृष्णात डोणे यांची भाकणूक…

..आणि सर चिडले : कुरुंदवाड नगरपालिका चौकात निवडणुकीवरुन वाद

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : हातकणंगले लोकसभा मतदार संघाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कुरुंदवाड शहरामध्ये देखील चौकाचौकात कट्यावर निवडणुकीची चर्चा पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) निवडणुकीच्या चर्चेतून वाद झाल्याची घटना पालिका चौकात घडली. नेहमीच गजबजलेल्या पालिका चौकात तत्कालीन लोकप्रतिनिधींनी आमच्या भैरववाडीमध्ये काय कामे केली आहेत ? असा सवाल चर्चेत केला. यावेळी लगतच्या गावचे नेते (सर) टोपननाव असलेले… Continue reading ..आणि सर चिडले : कुरुंदवाड नगरपालिका चौकात निवडणुकीवरुन वाद

error: Content is protected !!