राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) ; राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज (शुक्रवार) मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील… Continue reading राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू : मुख्यमंत्री

इचलकरंजी लालबावटा युनियनचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीमधील यंत्रमाग उद्योगातील कामगारांना मजूरी वाढ घोषित करा. अशी मागणी आज (शुक्रवार) लालबावटा जनरल कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी यांच्या कार्यालयात शॉप इन्स्पेक्टर श्रीमती लोहार यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, २०१३ साली झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार प्रत्येक वर्षी एक जानेवारी रोजी यंत्रमाग उद्योगातील कामगारांची… Continue reading इचलकरंजी लालबावटा युनियनचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन…

गार्डन्स क्लबचे पुष्पप्रदर्शन पर्यावरणपूरक: आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराज कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे पुष्पप्रदर्शन कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भरवण्यात आले. हे पुष्प प्रदर्शन पर्यावरणपूरक असल्याचे प्रतिपादन पालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून श्रीमती शांतादेवी पाटील, अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे कृषी सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम होले, डॉ. संग्राम… Continue reading गार्डन्स क्लबचे पुष्पप्रदर्शन पर्यावरणपूरक: आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे

मणेर मस्जिद रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकर करावे : शिवसेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेमधील क्षीरसागर चौक ते पापाची तिकटी, हंकारे हॉटेल ते मणेर मस्जिद रस्ता गेली अनेक वर्षे खराब झाला आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.  त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरुन जावे लागत आहे. तर अनेक अपघातही या खड्ड्यांमुळे घडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे लवकर डांबरीकरण करावे. अशी मागणी बुधवार… Continue reading मणेर मस्जिद रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकर करावे : शिवसेनेची मागणी

संभापुरचे नाव लवकरच देशात नावारुपाला येणार : भास्कर पेरे-पाटील

टोप (प्रतिनिधी) : संभापुरचा विकासाचा वेग पहाता लवकरच हे गाव जिल्ह्यासह देशात नावारुपाला येईल असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कास विजेते सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी केले. ते संभापुर येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात बोलत होते. यावेळी भास्कर पाटील यांनी, गावामध्ये शुद्ध हवा, पाणी गरजेचे असुन मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याबाबत सांगितले. गाव स्वच्छतेसाठी श़ंभर टक्के शौचालयाचा वापर करा, यामुळे… Continue reading संभापुरचे नाव लवकरच देशात नावारुपाला येणार : भास्कर पेरे-पाटील

कुरुंदवाडच्या विकासकामांसाठी ४ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर : दिपक गायकवाड

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेला शासनाच्या विविध विकास योजनेतून ४ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मूलभूत सेवासुविधा, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमनच्या मोटारसायकल आदींचा समावेश आहे. अशी माहिती प्रभारी नगराध्यक्ष दिपक गायकवाड यांनी दिली. दिपक गायकवाड म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजनेतून २ कोटी २५ लाख रुपये, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील १ कोटी… Continue reading कुरुंदवाडच्या विकासकामांसाठी ४ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर : दिपक गायकवाड

अथणी शुगर्सने अंतुर्ली ग्रामपंचायतीचा थकीत कर भरला…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील तांबाळे येथील अथणी शुगर्सकडून अंतुर्ली ग्रामपंचायतीचा सन २०१६-१७ पासुन थकीत असलेला  कर भरण्यात आला. या थकीत करासाठी अंतुर्ली ग्रामस्थांनी साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखली होती. पण भुदरगडच्या तहसीलदारांनी यात यशस्वी शिष्टाई केल्यानंतर कारखान्याने ग्रामपंचायत कर भरला. त्यामुळे ग्रामस्थांनी कारखाना व भुदरगड प्रशासनाचे आभार मानले आहेत. थकीत ग्रामपंचायत करासाठी अंतुर्ली ग्रामस्थांच्या… Continue reading अथणी शुगर्सने अंतुर्ली ग्रामपंचायतीचा थकीत कर भरला…

‘लाईव्ह मराठी’ इम्पॅक्ट : अखेर तो धोकादायक पोल बदलला      

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोडपैकी कुरणेवाडी येथे आठ दिवसापूर्वी रात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्यालगत असलेला विद्युत वाहक पोल मोडला होता.‌ तरीही या पोलवरून कुरणेवाडी आणि तेली वसाहत येथे विद्युत पुरवठा सुरू होता. यासंदर्भात ‘लाईव्ह मराठी’ने २० डिसेंबर रोजी हा संबंधित पोल बदलण्या संदर्भात वृत्त प्रसारीत केले होते. या वृत्ताची दखल घेत महावितरण कंपनीने… Continue reading ‘लाईव्ह मराठी’ इम्पॅक्ट : अखेर तो धोकादायक पोल बदलला      

कैलासगडची स्वारी मंदिराच्या उपाध्यक्षपदी सत्यजित जाधव यांची निवड…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंगळवार पेठेतील प्रसिद्ध असणाऱ्या कैलासगडची स्वारी मंदिर विश्वस्त समितीच्या उपाध्यक्षपदी दिवंगत आ. चंद्रकांत जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. आ. चंद्रकांत जाधव हे मंदिर विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजीत करण्यात आली होती. या निवडीच्या अध्यक्षस्थानी मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव होते.… Continue reading कैलासगडची स्वारी मंदिराच्या उपाध्यक्षपदी सत्यजित जाधव यांची निवड…

अथणी शुगर्सची ऊस वाहतुक अंतुर्ली ग्रामस्थांनी पाडली बंद…

गारगोटी (प्रतिनिधी) : अथणी शुगर्सने अंतुर्ली ग्रामपंचायतीची २०१६ पासुनची तब्बल १ कोटी ६ लाख ४४ हजार रूपयांची कराची रक्कम थकवली आहे. याबाबत अंतुर्ली ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी अथणी शुगर्सला कराची रक्कम भरण्याच्या लेखी सुचना देऊनही त्यांनी दाद दिली नाही. ही रक्कम न दिल्याने आज (मंगळवार) अथणी शुगर्स युनीटकडे जाणारी सर्व ऊसाची वाहतूक ग्रामस्थांनी रोखून धरली. यावेळी… Continue reading अथणी शुगर्सची ऊस वाहतुक अंतुर्ली ग्रामस्थांनी पाडली बंद…

error: Content is protected !!