रुपणेवाडीच्या शाळेत महाडिक युवाशक्तीतर्फे रोपांचे वाटप

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील रुपणेवाडी येथील शाळेत खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीतर्फे मोफत वृक्ष वाटप करण्यात आले. गगनबावडा तालुक्यातील महाडिक गटाचे अस्तित्व काही दिवसांपूर्वी कमी झाल्याचे दिसत होते; परंतु धनंजय महाडिक भाजपकडून खासदार झाल्यापासून राजकारणात एक कमालीचा बदल घडला आहे. यामुळे गगनबावडा तालुक्यातील भाजप व महाडिक गटाचे कार्यकर्ते उत्साही झाले आहेत. धनंजय महाडिक खासदार झाल्यामुळे… Continue reading रुपणेवाडीच्या शाळेत महाडिक युवाशक्तीतर्फे रोपांचे वाटप

शिक्षक बँकेतर्फे कर्जावर एक अंकी व्याजदर देणार : अर्जुन पाटील

कुंभोज (प्रतिनिधी) : सुकाणू समितीच्या सल्ल्यानुसार बँकेचा कारभार चालवणार असून, सभासदांनी घेतलेल्या कर्जावर एक अंकी व्याजदर व चांगला लाभांश देण्यासाठी संस्था व सर्व संचालक बांधिल आहेत, असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन अर्जुन पाटील यांनी केले. प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल सर्व नूतन संचालकांचा व सुकाणू समिती सदस्यांचा रा. शाहू स्वाभिमानी शिक्षक… Continue reading शिक्षक बँकेतर्फे कर्जावर एक अंकी व्याजदर देणार : अर्जुन पाटील

गडहिंग्लज उपनिबंधक कार्यालयामुळे नागरिकांचे त्रास वाचणार : मुश्रीफ

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमध्ये नव्याने बांधकाम होणाऱ्या उपनिबंधक कार्यालय इमारतीमुळे नागरिकांचे त्रास वाचतील, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. या कार्यालयाकडे दस्त करण्यासाठी येणाऱ्यांना आवश्यक सर्व त्या सुविधा पुरविल्या जातील, असेही ते म्हणाले. गडहिंग्लजमध्ये उपनिबंधक कार्यालय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यातून सुसज्ज व अद्ययावत उपनिबंधक… Continue reading गडहिंग्लज उपनिबंधक कार्यालयामुळे नागरिकांचे त्रास वाचणार : मुश्रीफ

न्यू कॉलेजचे माजी ग्रंथपाल पी. सी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील न्यू कॉलेजचे माजी ग्रंथपाल पी. सी. पाटील (वय ८०) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. शिवाजी विद्यापीठातील अधिसभा सदस्यसह चंदगड तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांवर त्यांनी काम केले होते. ते उजळाईवाडी येथे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गेली ४० वर्षे शेकडो विद्यार्थी,… Continue reading न्यू कॉलेजचे माजी ग्रंथपाल पी. सी. पाटील यांचे निधन

कुंभोजमध्ये समाजमंदिराच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु

कुंभोज (प्रतिनिधी) : येथील एसटी स्टँड परिसरात असणाऱ्या मातंग समाजमंदिराच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा प्रारंभ माजी उपसरपंच दाविद घाडगे, सदाशिव महापुरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. गावांतर्गत सेवा सुविधा करण्याच्या उद्देशाने माध्यमातून मातंग समाजमंदिर संरक्षक भिंतीसाठी आमदार राजू बाबा आवळे यांच्या फंडातून दहा लाख रुपये देण्यात आले. कुंभोज परिसरात आमदार राजू बाबा आवळे यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा फंड… Continue reading कुंभोजमध्ये समाजमंदिराच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु

कुरुंदवाडमध्ये हजरत दौलतशहा वली दर्ग्याच्या उरुसाला सुरुवात…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाडमधील ग्रामदैवत हजरत दौलतशहा वली यांच्या उरुसाला सुरूवात झाली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या समानतेची शिकवण देणाऱ्या दौलतशहा दर्ग्याच्या उरूसाचे मानकरी गाव कामगार पोलीस पाटील रावसाहेब पाटील यांच्या हस्ते गलेफ व संदल अर्पण करण्यात आले. तर पोलीस प्रशासनातर्फे मानाचा गलेफ अर्पण करून उरूसाला प्रारंभ करण्यात आला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक व परंपरा… Continue reading कुरुंदवाडमध्ये हजरत दौलतशहा वली दर्ग्याच्या उरुसाला सुरुवात…

आ. ऋतुराज पाटील यांनी शिष्टमंडळासह घेतली पोलीस अधीक्षकांची भेट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि  उपनगरातील चोऱ्यांच्या वाढत्या घटनाच्या पार्श्वभूमीवर आ. ऋतुराज पाटील यांनी जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. तसेच चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशा सूचना केल्या. तसेच शहर आणि उपनगरात गस्त वाढवून मोरेवाडी, पाचगाव, जुना वाशी नाका, कळंबा या परिसरातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे लवकर दुरुस्त केले जातील,… Continue reading आ. ऋतुराज पाटील यांनी शिष्टमंडळासह घेतली पोलीस अधीक्षकांची भेट…

जयप्रभा स्टुडिओप्रश्नी रक्तदान शिबिराद्वारे अनोखे आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरची अस्मिता आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला जयप्रभा स्टुडिओ नामशेष होण्याच्या मार्गावर असून, तो वाचविण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कलाप्रेमीतर्फे जयप्रभा स्टुडिओ बचावासाठी गेली १५८ दिवस अखंडपणे ‘जयप्रभा’च्या दारात आणि विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहे. बुधवारी आंदोलकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. सध्या ब्लड बँकेमध्ये रक्ताचा पुरवठा व… Continue reading जयप्रभा स्टुडिओप्रश्नी रक्तदान शिबिराद्वारे अनोखे आंदोलन

होळकरांची राजमुद्रा नष्ट करणाऱ्यावर कारवाईची मागणी‌‌

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील अंबाबाई मंदिरातील नवग्रह मंदिरामधील चबुतऱ्यावरील होळकरची राजमुद्रा खोडून हेतूपुरस्सर मंदिराचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही प्रवृत्तींकडून झाला आहे. या प्रवृत्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करून ती राजमुद्रा पूर्ववत तयार करून बसवावी, अन्यथा या प्रश्नी आंदोलन छेडण्याचा इशारा मल्हार सेनेसह विविध संघटनांनी दिला आहे. अंबाबाई मंदिरात अनेक शिलालेख व बहुजनांची प्रतिके असणारे अनेक संदर्भ… Continue reading होळकरांची राजमुद्रा नष्ट करणाऱ्यावर कारवाईची मागणी‌‌

तिसंगी येथे विधवा महिलांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन तिसंगी, ता. गगनबावडा ग्रामपंचायतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण आणि सर्व विधवा महिलांमधून एक दिवसाचा सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यत्वाचा बहुमान देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सरपंच बंकट थोडगे यांनी पत्राद्वारे दिली आहे. हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा महिलांच्या सन्मानार्थ अनिष्ट प्रथा निर्मूलनाचा क्रांतिकारी… Continue reading तिसंगी येथे विधवा महिलांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

error: Content is protected !!