आपण कोणत्याही धर्माचे असला तरी आपल्या प्रार्थनास्थळावर स्वच्छता मोहीम राबवा- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेकरिता काहीच दिवसांचा कालावधी बाकी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर व पुजास्थळांची स्वच्छता करण्यात येत आहे. यानिमित्ताने आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघामधील मधील मृत्यूंजय मंदिरात महादेवांचे दर्शन घेऊन परिसराची साफसफाई केली. चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली… Continue reading आपण कोणत्याही धर्माचे असला तरी आपल्या प्रार्थनास्थळावर स्वच्छता मोहीम राबवा- चंद्रकांत पाटील

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

पुणे ( प्रतिनिधी ) स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त चिंचवडमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या अटल महाआरोग्य शिबिरास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थित राहून पाटील यांनी गरजू रुग्णांना आरोग्य संबंधित साहित्य वाटप केले. लक्ष्मणभाऊंना जाऊन आज एक वर्ष झाले यावर विश्वास बसत नाही. आजही अनेक प्रसंगी त्यांच्या आठवणींना उजाळा… Continue reading आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी अहोरात्र मेहनत करु- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ‘महाविजय 2024’ च्या संकल्पपूर्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या भाजपा सुपर वॉरियर्स मेळाव्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रचंड बहुमताच्या विजयाच्या संकल्पपूर्तीचा निर्धार यावेळी करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्व सुपर वॉरियर्सनी… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी अहोरात्र मेहनत करु- मंत्री चंद्रकांत पाटील

शाळा हे विद्यार्थ्यांचे उत्तम भविष्य घडविणारे केंद्र : ना. चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. आपल्या कोथरूड मतदार संघाच्या विकासासाठी पाटील सदैव तत्पर असतात. आज त्यांनी क्रिएटिव्ह फाऊंडेशन सतीश गायकवाड मित्र परिवाराच्या माध्यमातून कोथरुड मधील पालकर शाळेला शालेय उपयोगी वस्तूंचे व क्रीडा साहित्यांचे वाटप केले. चंद्रकांत पाटील यांनी, शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही… Continue reading शाळा हे विद्यार्थ्यांचे उत्तम भविष्य घडविणारे केंद्र : ना. चंद्रकांत पाटील

मोठी बातमी..! रोहित पवार यांच्या ‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची धाड

पुणे ( वृत्तसंस्था ) शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ईडीचे पथक शुक्रवारी (5 जानेवारी ) सकाळी बारामती अ‍ॅग्रोमध्ये पोहोचत कंपनीचे कार्यालय इतर लोकांसाठी बंद करण्यात आले आहे. या कंपनीचे मालक आमदार रोहित पवार आहेत. रोहित पवार यांच्या कंपन्या केंद्र आणि राज्याच्या… Continue reading मोठी बातमी..! रोहित पवार यांच्या ‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची धाड

नवी मुंबईत आंदोलनकर्त्या ट्रकचालकांची पोलिसांना मारहाण…

नवी मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे वाहतूक व्यावसायिक संतप्त झाले आहेत. देशभरात या कायद्याला विरोध दर्शवला जात आहे. त्यामुळे ट्रकचालकांनी दुरुस्तीला विरोध करत देशभरात संप पुकारला आहे. नवी मुंबईतही या कायद्याच्या विरोधात वाहनचालक रस्त्यावर उतरले आहेत. मात्र उरण जेएनपीटी मार्गावर आंदोलन करणाऱ्या ट्रकचालकांनी पोलिसांना दगडाने आणि बांबूने मारहाण… Continue reading नवी मुंबईत आंदोलनकर्त्या ट्रकचालकांची पोलिसांना मारहाण…

कोरोनाचे महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण : संख्या 134 वर

मुंबई (प्रतिनिधी) : नव्या व्हेरियंटनंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 826 नवीन रुग्ण आढळले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात सर्वाधिक 134 बाधितांची नोंद झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटकात 131 रुग्ण आढळले आहेत. बिहार, कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. यासह, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4000 च्या… Continue reading कोरोनाचे महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण : संख्या 134 वर

…म्हणून मानद डॉक्टरेट देवेंद्र फडणवीस यांना प्रदान- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील  

पुणे ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण व सामाजिक समानतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे मंगळवारी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. कोयासन विद्यापीठाच्या 120 वर्षाच्या इतिहासात मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय आहेत. मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उच्च व तंत्र… Continue reading …म्हणून मानद डॉक्टरेट देवेंद्र फडणवीस यांना प्रदान- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील  

आमदार दिगंबर भेगडेंच्या पश्चात मावळ विकासासाठी प्रयत्नशिल- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) मावळचे माजी आमदार स्वर्गीय दिगंबर भेगडे यांचा आज प्रथम स्मृतीदिन! यानिमित्त त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीला प्रेरणा देत रहावे यासाठी त्यांचे कुंडमळा इंदोरी येथे स्मारक उभारण्यात आले आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी स्वर्गीय दिगंबर यांच्या पुणे पदवीधर… Continue reading आमदार दिगंबर भेगडेंच्या पश्चात मावळ विकासासाठी प्रयत्नशिल- मंत्री चंद्रकांत पाटील

मकरसंक्रांतीचे औचित्य साधून पतंग महोत्सवाचे आयोजन करणार- मंत्री चंद्रकांत पाटील 

पुणे ( प्रतिनिधी ) गड-किल्ले ऐतिहासिक वास्तूंबद्दल नवीन पिढीमध्ये जागरुकता आणि आस्था निर्माण व्हावी तसेच नवीन पिढीमध्ये सांघिक भावना रुजावी या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांघिक किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात केली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी… Continue reading मकरसंक्रांतीचे औचित्य साधून पतंग महोत्सवाचे आयोजन करणार- मंत्री चंद्रकांत पाटील 

error: Content is protected !!