‘पुणे पदवीधर, शिक्षक’साठी जिल्ह्यातील २८१ केंद्रांंवर उद्या मतदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या (मंगळवार) १ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील २८१ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन तैनात करण्यात आले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप मित्रपक्षांमध्ये लढत होत असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ… Continue reading ‘पुणे पदवीधर, शिक्षक’साठी जिल्ह्यातील २८१ केंद्रांंवर उद्या मतदान

…तर जयंत पाटील हे भाजप सरकारमध्ये मंत्री झाले असते : नारायण राणे

रत्नागिरी (प्रतिनिधी) : सध्या राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी जर राज्यात भाजपचे सरकार असते तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपमध्ये असते, एवढेच नव्हे, मंत्रीपदावर असते, असा खळबळजनक दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला. ते आज (सोमवार) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत जयंत पाटील… Continue reading …तर जयंत पाटील हे भाजप सरकारमध्ये मंत्री झाले असते : नारायण राणे

आकुर्डे सरपंचपदी गीता पाटील यांची निवड

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे येथे राजकीय समझोत्यानुसार लोकनियुक्त सरपंच मनिषा प्रकाश पाटील यांनी तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्या गीता भगवान पाटील यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून कळे मंडळ अधिकारी सुरेश ठाकरे यांनी काम पाहिले.   स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेविका शिंगाडे यांनी केले. निवडीनंतर… Continue reading आकुर्डे सरपंचपदी गीता पाटील यांची निवड

मुख्यमंत्री, अशोक चव्हाण, खा. संभाजीराजे यांची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘सुपर न्यूमरी’ आणि मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची बुधवारी (दि.२) मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ११ वी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजलेला आहे. खा. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘सुपर न्यूमरी’ पद्धतीने… Continue reading मुख्यमंत्री, अशोक चव्हाण, खा. संभाजीराजे यांची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक

कोरोनामुळे भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या प्राणघातक विषाणूमुळे आतापर्यंत अनेकांणा आपले प्राण गमवावे लागले आहेत. सर्व सामान्य जनतेपासून ते दिग्गज व्यक्तींना देखील या महामारीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात शोक व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट… Continue reading कोरोनामुळे भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन

शेतकरी दहशतवादी आहेत का ? : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : सलग पाचव्या दिवशी कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरूच आहे. या आंदोलक शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का ? असा सवाल करत त्यांनी बळाचा वापर चीनच्या सीमेवर करा, असा सल्लाही केंद्र सरकारला दिला आहे. ‘जो शेतकरी… Continue reading शेतकरी दहशतवादी आहेत का ? : संजय राऊत

कोल्हापुरातून संग्राम देशमुख यांना मोठी आघाडी : शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. त्याचबरोबर भाजपच्यावतीने विक्रमी अशी मतदार नोंदणी करण्यात आली आहे. या माध्यमातून भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना जिल्ह्यातून मोठी आघाडी मिळेल, असा विश्वास भाजपच्या कोल्हापूर महिला मोर्चाच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला. पुणे मतदारसंघातील उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारानिमित्त आयोजित… Continue reading कोल्हापुरातून संग्राम देशमुख यांना मोठी आघाडी : शौमिका महाडिक

चंद्रकांत पाटलांना रूपाली चाकणकरांचा टोला…

मुंबई (प्रतिनिधी) : सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का ? अशा शब्दांत टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. स्वप्नातले सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबानेच उतरवले आहे. तसे नसते तर १०५ आमदार घेऊन चंद्रकांतदादांना घरी बसावे लागले नसते, असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली… Continue reading चंद्रकांत पाटलांना रूपाली चाकणकरांचा टोला…

चंद्रकांत पाटील कधी जेलमध्ये गेलेत का ?: जयसिंगराव गायकवाड

औरंगाबाद (प्रतिनिधी) : भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ‘चंद्रकांत पाटील यांनी कधी आंदोलन केले आहे का, त्यांना तुरुंग आणि पोलीस कस्टडी काय असते हे माहिती आहे का?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत… Continue reading चंद्रकांत पाटील कधी जेलमध्ये गेलेत का ?: जयसिंगराव गायकवाड

कोरोना महामारीतही भ्रष्टाचार : चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारला १ वर्ष पूर्ण झाले. भाजप सत्तेत येईल या भीतीने नाराज असलेले पुन्हा एकत्र येण्याचे प्रकार घडले. सरकार संपूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत असून, वर्षभरात अनेक भ्रष्टाचार झाले आहेत. कोरोना महामारीतही भ्रष्टाचार केला. आपले वाभाडे निघतील या भितीनेच सरकार अधिवेशन घ्यायला घाबरत आहे. हिंमत असेल तर अधिवेशन घेऊन दाखवा, असे आव्हान भाजपचे… Continue reading कोरोना महामारीतही भ्रष्टाचार : चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!