गडहिंग्लज ‘पंचायत समिती’ राज्यात सर्वोत्कृष्ट

गडहिंग्लज (प्रतिनिधी)  :  भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून देण्यात येणारा राज्यस्तरावरील ‘दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार’  गडहिंग्लज पंचायत समितीला प्राप्त झाला. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून १ जिल्हा परिषद,  २ पंचायत समिती आणि १४ ग्रामपंचायती निवडण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत सातारा तर ग्रामपंचायतीमधून १४ गावामध्ये कागल तालुक्यातील तमनाकवाडा या गावाची निवड झाली आहे. ‘यशवंत पंचायत… Continue reading गडहिंग्लज ‘पंचायत समिती’ राज्यात सर्वोत्कृष्ट

पालकमंत्र्यांचे ‘गोकुळ’मध्ये सत्ता परिवर्तनाचे स्वप्न भंगणार : शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) कारभार आमदार पी. एन. पाटील,  ज्येष्ठ संचालक  अरूण  नरके आणि  माजी आमदार  महादेवराव महाडिक यांनी शेतकरी हिताचा केला आहे. त्यामुळे  दूध उत्पादकांचा सत्ताधाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच गोकुळमध्ये सत्ता परिवर्तनाचे पालकमंत्र्यांचे  स्वप्न भंगणार आहे, असा टोला  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी लगावला .… Continue reading पालकमंत्र्यांचे ‘गोकुळ’मध्ये सत्ता परिवर्तनाचे स्वप्न भंगणार : शौमिका महाडिक

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप

पुणे  (प्रतिनिधी) : लैंगिक अत्याचारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली. तृप्ती देसाई यांनी पीडितेसह आज (गुरूवार) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.    पत्रकार परिषदेत पीडिता म्हणाली की,  विटेकर यांनी माझे अश्लील व्हिडिओ काढले आहेत.  ते वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर… Continue reading राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप

फालतू राजकारण करू नका : शिवसेनेने भाजपला सुनावले

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचविण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे. कोरोना कुणालाही सोडत नाही,  असे शिवसेनेने म्हटले आहे. मुंबई, पुणे,… Continue reading फालतू राजकारण करू नका : शिवसेनेने भाजपला सुनावले

शरद पवारांच्या आजाराविषयी विकृत पोस्ट टाकणाऱ्यांना धडा शिकवणार

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यावर किंवा कार्यकर्त्यांवर मर्यादा सोडून टीका केली, तर ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला आहे. पवार यांच्यावर मंगळवारी रात्री तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर समाज माध्यमांवर दिल्लीतील काही भाजप नेत्यांनी आणि काही नेटकऱ्यांनी शरद पवारांवर विकृत… Continue reading शरद पवारांच्या आजाराविषयी विकृत पोस्ट टाकणाऱ्यांना धडा शिकवणार

‘शिवनाकवाडी’च्या सुधारित पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता : ना. राजेंद्र पाटील – यड्रावकर

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी या गावासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना मंजूर होती, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे या योजनेचे काम अर्ध्यावरच रखडले होते. या सुधारित योजनेच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली असून सुमारे ३ कोटी २ लाखांच्या या योजनेची निविदा लवकरच प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी स्पष्ट… Continue reading ‘शिवनाकवाडी’च्या सुधारित पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता : ना. राजेंद्र पाटील – यड्रावकर

आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून नवा वाद

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेवरून वादविवाद झाले. आता यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधील जुन्या महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे भूमिपूजन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण दिलेले नाही. यावरून… Continue reading आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून नवा वाद

रंकाळा विकासासाठी दरवर्षी १ कोटींचा निधी देऊ : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रंकाळा तलाव विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळातून दरवर्षी एक कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या प्रयत्नातून रंकाळा तलाव परिसरात झालेल्या विविध विकासकामांचे व स्वयंचलित पद्धतीने बसविलेल्या विविध प्राण्यांच्या प्रतिकृतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागाकडे… Continue reading रंकाळा विकासासाठी दरवर्षी १ कोटींचा निधी देऊ : पालकमंत्री

चंद्रकांत पाटील त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की…: शिवसेनेचा टोला

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा यांच्या गुप्त भेटीच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या भेटीवरून अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या   भेटीवर शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. सध्या पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे… Continue reading चंद्रकांत पाटील त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की…: शिवसेनेचा टोला

शरद पवारांची रात्री शस्त्रक्रिया ; सकाळी ठणठणीत

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पोटदुखीचा त्रास वाढल्याने मंगळवारी रात्री त्याच्यावर तातडीने ब्रीच कँडी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (बुधवार) सकाळी शरद पवारांचा रूग्णालयातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात पवार वृत्तपत्र वाचताना दिसत आहेत. सुप्रभात, ब्रीच कँडी रूग्णालयातील सर्व डॉक्टर्स,… Continue reading शरद पवारांची रात्री शस्त्रक्रिया ; सकाळी ठणठणीत

error: Content is protected !!