कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नव्या पक्षाची घोषणा

चंदीगढ (वृत्तसंस्था) : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर काँग्रेसच्या सदस्यपदाचा  राजीनामा देऊन आपल्या नव्या पक्षाच्या नावाची घोषणा केली आहे. राजीनामा देताना त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ‘पंजाब लोक काँग्रेस’ असे आपल्या नव्या पक्षाचे नामांतर केले आहे. अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या  पत्रात नाराजी व्यक्त करताना म्हटले… Continue reading कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नव्या पक्षाची घोषणा

देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय  

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत  काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी ४१ हजार ९३३ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.   पहिल्या फेरीपासूनच जितेश अंतापूरकर आघाडीवर होते. शेवटच्या फेरीअखेर अंतापूरकर यांना १ लाख ८ हजार ८४० मते मिळाली. तर भाजपच्या सुभाष साबणे यांना ६६ हजार… Continue reading देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय  

भाजपच्या बाल्लेकिल्ल्याला खिंडार : दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा विजय

दादरा नगर हवेली  (वृत्तसंस्था) : दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर रिक्त  झालेल्या दादरा नगर हवेली लोकसभा  मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे.  शिवसेनेच्या  उमेदवार कलाबेन डेलकर यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरच्या पहिल्या खासदार  निवडून आल्याने हा ऐतिहासिक विजय मानला जात आहे.  कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरच्या पहिल्या खासदार आहेत. मोहन… Continue reading भाजपच्या बाल्लेकिल्ल्याला खिंडार : दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा विजय

फटाके जरूर फोडा, पण धूर काढू नका ; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला  

बारामती  (प्रतिनिधी) :  राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर आपण फटाके फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. बारामतीमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन आज (मंगळवार) करण्यात आले. याप्रसंगी… Continue reading फटाके जरूर फोडा, पण धूर काढू नका ; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला  

…तेव्हा त्यांना बाथरूममध्ये तोंडं लपवून बसावं लागेल : संजय राऊत

मुंबई  (प्रतिनिधी) : लोकशाहीत राजकारणाचा संघर्ष असतोच. पण  केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षांमार्फत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या चौकशीचे सत्र सुरु आहे. भाजपचे लोक जंगलात राहतात का ?  त्यांच्या संपत्ती वैध आहे का?  असे प्रश्न उपस्थित करत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज (मंगळवार)  भाजपवर निशाणा साधला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.… Continue reading …तेव्हा त्यांना बाथरूममध्ये तोंडं लपवून बसावं लागेल : संजय राऊत

अजित पवार अडचणीत ; आयकर विभागाने पाठवली नोटीस

मुंबई  (प्रतिनिधी) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाने आज (मंगळवार) नोटीस पाठवली आहे. तसेच अजित पवारांशी संबंधित कोट्यावधींची संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  मागील काही दिवसांपासून अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी व… Continue reading अजित पवार अडचणीत ; आयकर विभागाने पाठवली नोटीस

हुपरीच्या उपनगराध्यक्षपदी गणेश वाइंगडे बिनविरोध

रांगोळी (प्रतिनिधी) : हुपरी नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने उपनगराध्यक्ष पद रिक्त होते. त्यामुळे आज (सोमवार) सर्वानुमते ताराराणी पक्षाचे नगरसेवक गणेश वाइंगडे यांचा उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, अमित गाट यांच्या वतीने हुपरीतील जवाहर साखर… Continue reading हुपरीच्या उपनगराध्यक्षपदी गणेश वाइंगडे बिनविरोध

ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर अनिल देशमुखांनी दिली प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : अनेक दिवसांपासून गायब असलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आज (सोमवार) ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांनी आपली बाजू मांडणारा व्हिडिओ ट्वीट केला आहे. याआधी त्यांनी २ जुलैला ट्वीट केले होते.   या व्हिडिओत देशमुख यांनी म्हटले आहे की, नमस्कार, मी अनिल देशमुख बोलतोय. मला जेव्हा ईडीचा समन्स आला. तेव्हा… Continue reading ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर अनिल देशमुखांनी दिली प्रतिक्रिया

दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब फो़डणार : देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई  (प्रतिनिधी) : ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत, त्यांनी माझ्यावर बोलू नये. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो ट्विट केला. दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फो़डेन,  असा इशारा विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस  यांनी  अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  यांना  दिला आहे. आज (सोमवार) पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मलिक यांनी केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. नवाब मलिकांनी ट्विटरवर भाजप आणि ड्रग्स… Continue reading दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब फो़डणार : देवेंद्र फडणवीसांचा इशारा

राज्यातील ड्रग्ज उद्योगांचे देवेंद्र फडणवीस मास्टरमाइंड : नवाब मलिक

मुंबई (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा आरोप  करून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. ड्रग्ज पेडलर  जयदीप राणा सध्या तुरुंगात असून  याच राणाने फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्यासाठी फायनान्स हेड म्हणून काम केल्याचेही मलिक यांनी सांगितले.   फडणवीस… Continue reading राज्यातील ड्रग्ज उद्योगांचे देवेंद्र फडणवीस मास्टरमाइंड : नवाब मलिक

error: Content is protected !!