टोप येथील छ. राजाराम सोसायटीत चुरशीने ९५.९४ टक्के मतदान…

टोप (प्रतिनिधी) :  टोप येथील छ.राजाराम विकास सेवा संस्थेची निवडणुकीचे मतदान आज (रविवार) मोठ्या चुरशीने झाले. यामध्ये ५४३ पैकी ४२१ सभासद मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन २० सभासद मयत आहेत. त्यामुळे अत्यंत अतितटीच्या झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडी की परिवर्तन यामध्ये सरशी नक्की कोण मारणार याकडे टोपसह पंचक्रोशीचे लक्ष लागुन राहिले आहे. कांहिच वेळात… Continue reading टोप येथील छ. राजाराम सोसायटीत चुरशीने ९५.९४ टक्के मतदान…

…त्यांची अशी थट्टा तरी करू नका : देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही ? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तरी करू नका ! दोषींवर कठोर कारवाई कराच ! पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही? असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सरकारवर… Continue reading …त्यांची अशी थट्टा तरी करू नका : देवेंद्र फडणवीस

हे ऐकून आपणच गुन्हेगार आहोत, असं वाटतंय : शरद पवार

मुंबई (प्रतिनिधी) : कवी मोतीलाल राठोड यांच्या ‘पाथरवट’  या कविता ऐकून रात्री झोप येत नाही. तसेच हे ऐकून आपणच गुन्हेगार आहोत, असेही वाटते, असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ते त्यांच्या जन्मदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात  बोलत होते. शरद पवार म्हणाले की,  मी अनेकदा संध्याकाळी गरीब समाजातून आलेल्या तरुणांसोबत घालवली आहे. त्याच्या मनात… Continue reading हे ऐकून आपणच गुन्हेगार आहोत, असं वाटतंय : शरद पवार

राजकारणाला कुस बदलायला लावणारा धुरंधर नेता म्हणजे शरद पवार..!

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात जवळ जवळ सहा – सात दशकांपासून शरद पवार या नावाचा दबदबा आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला शरद पवार हे नाव माहित आहे.  राजकारणात तर त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही असं म्हणावं लागेल. त्यांच्या प्रत्येक कृतीचा अंदाज लावता लावता लोकं डोक्याचा भुगा करतात. आणि जीव ओवाळून टाकायचं म्हणाल, तर कायम स्वरूपी त्यांना… Continue reading राजकारणाला कुस बदलायला लावणारा धुरंधर नेता म्हणजे शरद पवार..!

टोप येथील राजाराम विकास संस्थेच्या सत्तेसाठी चुरस        

टोप (प्रतिनिधी) : येथील छ. राजाराम विकास सेवा संस्थेची १०० व्या वर्षाकडे वाटचाल सुरु असताना आता तब्बल १२ वर्षांनंतर निवडणूक लागली आहे. निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी चुरशीने संपला. यावेळी सत्ताधारी तसेच विरोधी परिवर्तन पॅनेलने शक्तिप्रदर्शन करत पायी प्रचार फेरी पूर्ण केली. यावेळी सभासदासह शेकडो महिलांसह कार्यकर्ते उपस्थित होते. तब्बल १२ वर्षानंतर लागलेल्या या निवडणुकीत एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांची… Continue reading टोप येथील राजाराम विकास संस्थेच्या सत्तेसाठी चुरस        

सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठबळ द्या : डॉ. कल्लैश्वर मुळीक

टोप (प्रतिनिधी) : सभासदांना चांगल्या प्रकारे सोयीसुविधा मिळण्यासाठी तसेच सभासदांचा विकास होण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठबळ द्या, असे आवाहन डॉ. कल्लैश्वर मुळीक यांनी केले. ते छ. राजाराम विकास सेवा संस्थेच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी नंदकुमार मिरजकर यांच्या सहकार्यातून गावात ‘केडीसीसी’ बँकेची शाखा आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माणिक पाटील यांनी सभासदांपर्यंत विविध योजना… Continue reading सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठबळ द्या : डॉ. कल्लैश्वर मुळीक

सभासदांच्या हिताचा कारभार करण्यासाठी संधी द्या : पिलाजी पाटील

टोप (प्रतिनिधी) : सभासदांच्या हिताचा कारभार करण्यासाठी चांगले लोक उमेदवार म्हणून दिले आहेत. संस्था आणि सभासद यांच्यातील दुवा म्हणून आम्ही काम करणार आहोत. गेल्या ३६ वर्षांच्या सहकारातील अनुभवाचा उपयोग शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी करू, असे प्रतिपादन परिवर्तन पॅनेलचे प्रमुख पिलाजी पाटील यांनी केले. टोप येथील छ. राजाराम विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.… Continue reading सभासदांच्या हिताचा कारभार करण्यासाठी संधी द्या : पिलाजी पाटील

मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘नगरोत्थान’ सारखी योजना राबविणार : ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास विभाग सदैव तत्परतेने काम करीत आहे. यापुढे पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेसारखी योजना राबविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (शनिवार) येथे केले. हातकणंगले येथे बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते… Continue reading मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘नगरोत्थान’ सारखी योजना राबविणार : ना. हसन मुश्रीफ

मुरगूड येथे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप

मुरगूड (प्रतिनिधी) : देशाचे नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त मुरगूड शहर राष्ट्रवादीच्या वतीने मुरगूड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटण्यात आली. घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आली. मुरगूड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन… Continue reading मुरगूड येथे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप

मी शरद पवारांना खुर्ची का दिली?, हे समजण्यासाठी ६१ भाषणं वाचा : संजय राऊत  

मुंबई (प्रतिनिधी) : मी शरद पवारांना दिल्लीत खुर्ची बसायला दिली, त्यावरुन सोशल मीडियावर फार टीका करण्यात आल्या. पण त्यांना बसण्यासाठी मी खुर्ची का दिली ? हे समजून घ्यायचे असेल, तर पवारांची ६१ भाषणं वाचली पाहिजेत.  जे अत्यंत विकृतपणे त्या प्रसंगावर टीका करत होते, त्यांनी हा ग्रंथ वाचल्यावर कळेल, माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराने शरद पवारांना खुर्ची का… Continue reading मी शरद पवारांना खुर्ची का दिली?, हे समजण्यासाठी ६१ भाषणं वाचा : संजय राऊत  

error: Content is protected !!