कोल्हापूरच्या गोपालकृष्ण कालेकर यांना थायलंडमधील योग स्पर्धेत रौप्यपदक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वर्ल्ड योगा स्पोर्ट्स फेडरेशन, अमॅच्युअर योगा थायलंड आणि योगा कल्चर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने थायलंडमधील बँकॉक येथे पार पडलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत कोल्हापुरातील गोपालकृष्ण कालेकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना पारंपरिक योग स्पर्धा प्रकारात 40 ते 50 वयोगटात रौप्यपदक पटकावले. बँकॉक येथे झालेल्या या योग स्पर्धेत थायलंड, लाओस, भारत, कंबोडिया,… Continue reading कोल्हापूरच्या गोपालकृष्ण कालेकर यांना थायलंडमधील योग स्पर्धेत रौप्यपदक

आसगांवच्या जिजाऊ पाटीलचे तलवारबाजीमध्ये नेत्रदीपक कामगिरी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) राजमुंद्री (आंध्रप्रदेश) येथे २५ ते २८ मार्च दरम्यान झालेल्या २५ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत कु. जिजाऊ जीवन पाटील (रा. आसगांव, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) ही वैयक्तिक फॅाईल प्रकारात सुवर्ण पदक आणि टीम फॅाईलमध्ये ब्रॅाझ पदक पटकावले. जिजाऊ पाटील हिचे वय ११असून तिने १४ वर्षाखालील गटात हे पदक मिळवले आहे. जिजाऊ पाटीलने… Continue reading आसगांवच्या जिजाऊ पाटीलचे तलवारबाजीमध्ये नेत्रदीपक कामगिरी…

कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून फुटबॉल खेळाडू-संघांचा अनोखा स्नेहमेळावा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापुरतील सर्व फुटबॉल खेळाडू आणि सर्व संघाचा अनोखा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्याला ४०० पेक्षा अधिक फुटबॉल शौकीन उपस्थित होते. त्यांच्याशी खासदार धनंजय महाडिक आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मनमोकळा संवाद साधला. तसेच फुटबॉल खेळाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देण्याची खासदार महाडिक यांनी ग्वाही दिली.… Continue reading कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून फुटबॉल खेळाडू-संघांचा अनोखा स्नेहमेळावा…

तुळस येथे ‘राष्ट्रवादी चषक २०२४’ चे उद्घाटन..

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस जकात नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर यांच्या संकल्पनेतून आयोजीत राष्ट्रवादी चषक २०२४ चे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धा दिनांक १५ ते १७ या कालावधीत होणार असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या संघाला २५ हजार आणि चषक… Continue reading तुळस येथे ‘राष्ट्रवादी चषक २०२४’ चे उद्घाटन..

केएम चषक फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला ना. चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील काल कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. तसेच छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या केएम चषक फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला देखील त्यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थित राहून ना. पाटील यांनी सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाला यंदा 111 वर्षे… Continue reading केएम चषक फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला ना. चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती…

आसमा चषक क्रिकेट स्पर्धेला रोमहर्षक प्रारंभ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अॅड एजन्सीज अँड मिडिया असोसिएशन (आसमा) आणि कोल्हापुरातील विविध वर्तमानपत्र, रेडिओ चॅनेल, टीव्ही चॅनेल यांच्या ‘आसमा चषक’ क्रिकेट स्पर्धा अत्यंत रोमहर्षक वातावरणात सुरू झाल्या. यामध्ये पुढारी, लोकमत, सकाळ, तरुण भारत, पुण्यनगरी, मिडिया इलेव्हन, आसमा कोल्हापूर आणि सांगली संघानी सहभाग घेतला आहे. शास्त्रीनगर येथील मैदानावर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या… Continue reading आसमा चषक क्रिकेट स्पर्धेला रोमहर्षक प्रारंभ…

फुटबॉल खेळामध्ये जाधव कुटुंबाचे मोठे योगदान : छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर : फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे फुटबॉलवरील प्रेम मी पाहिले आहे. प्रत्येक खेळाडूंना त्यांचा मोठा आधार होता. आण्णांचा वारसा आमदार जयश्री जाधव व सत्यजित जाधव समर्थपणे पुढे नेत आहेत. कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रातील जाधव कुटुंबाचे योगदान मोठे आहे असे मत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले. कोल्हापूर शहरातील सोळा वरिष्ठ (सीनियर) फुटबॉल… Continue reading फुटबॉल खेळामध्ये जाधव कुटुंबाचे मोठे योगदान : छत्रपती शाहू महाराज

शिवसेना आयोजित लोकनाथ चषक झेंडा चौकाने पटकावला…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कसबा बावडा विभागाच्या वतीने “लोकनाथ चषक” टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये अंतिम सामन्यात थरारक विजय मिळवत कसबा बावड्याच्या नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौकाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर मोहर उमटवली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना पक्षाच्यावतीने कसबा बावडा… Continue reading शिवसेना आयोजित लोकनाथ चषक झेंडा चौकाने पटकावला…

डी. वाय. पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे आ. सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रेसिडेंट कप स्पर्धेचे ग्रुपचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. संजय पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डीन डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ.… Continue reading डी. वाय. पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे आ. सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय ‘टेक्नोत्सवा’चे आयोजन

कसबा बावडा ( प्रतिनिधी ) कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे 12 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत “टेक्नोत्सव 2024” या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा अंगभूत कलागुणांना वाव देणे व आधुनिक तंत्रज्ञान वापरून विविध सामाजिक, पर्यावरण पूरक समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.… Continue reading डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय ‘टेक्नोत्सवा’चे आयोजन

error: Content is protected !!