लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल; मोदींच्या शुभेच्छा

पंढरपूर (प्रतिनिधी) : आळंदी आणि देहूवरून निघालेले लाखो वारकरी आता पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करून पुढे नामदेव पायरीच दर्शन घेत आहेत. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये घेऊन हे वारकरी चालत पंढरपूरपर्यंत पोहोचले आहेत. नामदेव पायरी बरोबरच ते विठुरायाचे देखील दर्शन घेणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा… Continue reading लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल; मोदींच्या शुभेच्छा

डिसेंबरमध्ये श्रीशैल पीठामार्फत महापदयात्रेचे आयोजन

नूल (प्रतिनिधी) : श्रीशैल पीठामार्फत काढण्यात येणारी महापदयात्रा, विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम व जनजागृती मेळाव्यात महाराष्ट्रातील सदभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीशैल पीठाचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. नूल (ता. गडहिंग्लज) येथील सुरगीश्वर मठामध्ये आयोजित केलेल्या सदभक्तांच्या मेळाव्यामध्ये श्रीशैल जगद्गुरु बोलत होते. यावेळी मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, गौरीशंकर शिवाचार्य स्वामीजी, आमदार राजेश… Continue reading डिसेंबरमध्ये श्रीशैल पीठामार्फत महापदयात्रेचे आयोजन

दिंडीमध्ये नाना पटोलेंनी लुटला भक्तिरसाचा आनंद

अकलूज (प्रतिनिधी) : येथे आलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मंगळवारी सहभागी झाले. त्यांनी पांडुरंगाच्या नामाचा जयघोष केला. ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात त्यांनीही या भक्तिरसाचा आनंद लुटला. पांडुरंगाची आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपर्वाचे चालते-बोलते रूप असते इथे सगळे भेद गळून पडतात. या वारीत सहभागी होण्याचा आणि इथल्या भक्तीनादात दंगण्याचा मोह साऱ्यांनाच होतो.… Continue reading दिंडीमध्ये नाना पटोलेंनी लुटला भक्तिरसाचा आनंद

तुकोबारायांच्या पालखीस छत्रपतींचा जरीपटका ध्वज अर्पण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना राजवाडा येथील देवघरात जरीपटक्याचे विधीवत पूजन करून संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्याकडे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते हा जरीपटका ध्वज सुपूर्द करण्यात आला. शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेस दिल्लीचा बादशहा औरंगजेब स्वराज्यावर चाल करुन दक्षिणेत आला, तेव्हा त्याने आषाढी वारीला उपद्रव करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजी महाराजांनी या पालखी… Continue reading तुकोबारायांच्या पालखीस छत्रपतींचा जरीपटका ध्वज अर्पण

पालखी मार्गांच्या विकासासाठी ११०० कोटींचा निधी : मोदी

पुणे (प्रतिनिधी) : पंढरपूर पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून ११०० कोटींचा खर्च करण्याबरोबर या माध्यमातून ३५० किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मोदी यांच्या हस्ते आज (मंगळवार) देहूतील संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर ते बोलत होते. पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, संत तुकाराम… Continue reading पालखी मार्गांच्या विकासासाठी ११०० कोटींचा निधी : मोदी

मुख्यमंत्री ठाकरेंना विठूरायाच्या महापूजेचे निमंत्रण

मुंबई (प्रतिनिधी) : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१० जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. निमंत्रण देण्यासाठी आलेल्या… Continue reading मुख्यमंत्री ठाकरेंना विठूरायाच्या महापूजेचे निमंत्रण

यंदा पंढरपुरात वैष्णवांचा मेळा : कार्तिकी एकादशी सोहळा होणार

पंढरपूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे दोन आषाढी एकादशी व एक कार्तिकी एकादशी सोहळा साधेपणाने झाला होता. पण कोरोना  परिस्थिती  नियंत्रण येऊ लागल्याने  निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.  या  पार्श्वभूमीवर  यंदा पूर्वीप्रमाणे कार्तिकी एकादशीचा सोहळा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे.   कार्तिक यात्रा पूर्व नियोजनाबाबत जिल्हा नियोजन भवन येथे आज (बुधवार) बैठकीचे आयोजन… Continue reading यंदा पंढरपुरात वैष्णवांचा मेळा : कार्तिकी एकादशी सोहळा होणार

चौथ्या दिवशी अंबाबाईची गजारुढ अंबारीतील सालंकृत महापूजा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज (रविवार) ललिता पंचमी दिवशी करवीर निवासनी श्री अंबाबाईची हत्तीवर बसून त्र्यंबोली देवीच्या भेटीला जातानाची सालंकृत महापूजा साकारण्यात आली. ही पूजा श्रीपूजक अरुण मुनिश्वर, विद्याधर मुनिश्वर, आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली. देव आणि दानव यांच्या युद्धामध्ये कामाक्ष राक्षसाने आपल्या योगदंडाच्या बळावर सर्व देवांना शेळ्या-मेंढ्या बनवले होते. देवी त्र्यंबोलीने… Continue reading चौथ्या दिवशी अंबाबाईची गजारुढ अंबारीतील सालंकृत महापूजा

करवीर निवासिनी अंबाबाईची माहेश्वरी रूपातील अलंकार पूजा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी माता महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची आज (शुक्रवार) माहेश्वरी रूपातील अलंकार पूजा साकारण्यात आली आहे. माहेश्वरी अर्थात शुंभनिशुंभ वधाच्या प्रसंगी रक्तबीज दैत्याचा संहार करण्यासाठी भगवतीच्या सहावी अर्थ प्रत्येक देवाची मूर्तीमंत शक्ती प्रगट झाली. त्या शक्तींना मातृका म्हणून ओळखले जाते. या मातृका मंडलापैकी भगवान शंकरांची अर्थात महेश्वर यांची शक्ती म्हणजे माहेश्वरी भगवान… Continue reading करवीर निवासिनी अंबाबाईची माहेश्वरी रूपातील अलंकार पूजा

जोतिबा डोंगरावरील श्री चोपडाईदेवीची श्रावण षष्ठी यात्रा पारंपरिक पद्धतीने, मात्र भाविकांविनाच…

वाडी रत्नागिरी (प्रतिनिधी) : येथील श्री जोतिबा डोंगरावरील श्री चोपडाईदेवीची श्रावण षष्ठी यात्रा मागील दोन वर्षांप्रमाणेच यंदाही भाविकांविनाच आणि पारंपरिक पद्धतीने पार पडली. आज (शुक्रवार) यात्रेचा मुख्य दिवस होता. एरवी भाविकांमुळे गजबजून जाणाऱ्या मंदिर परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुकशुकाट होता. आज सकाळी नित्यक्रमाने श्री जोतिबा देवास व श्री चोपडाई देवीला अभिषेक घालण्यात आला. यानंतर श्री जोतिबा… Continue reading जोतिबा डोंगरावरील श्री चोपडाईदेवीची श्रावण षष्ठी यात्रा पारंपरिक पद्धतीने, मात्र भाविकांविनाच…

error: Content is protected !!