शिरवळजवळ अपघातात एक वारकरी ठार, ३० जखमी

सातारा (प्रतिनिधी) : आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या एका गाडीला शिरवळ येथे भीषण अपघात झाला. या गाडीला आयशर ट्रकरने धडक दिली. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाल्याची माहिती शिरवळ पोलिसांनी दिली.   वारकरी ट्रॅक्टर ट्रॉलीतून पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. सातारा-पुणे महामार्गावरच्या शिरवळ खंडाळा येथे झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील… Continue reading शिरवळजवळ अपघातात एक वारकरी ठार, ३० जखमी

चंदगडचा पोलीस उपनिरीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित भागवत पांडे (वय ३४ सध्या रा. मजरे कार्वे, ता. चंदगड, मूळ रा. खोतवाडी ता. हातकणंगले) यास २० हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार व त्यांच्या वडिलांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात तपासामध्ये मदत करण्यासाठी ५० हजार लाचेची मागणी करून तडजोडी अंती ४० हजारवरुन पहिला हप्ता… Continue reading चंदगडचा पोलीस उपनिरीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

प्रज्ञा ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

भोपाळ (वृत्तसंस्था) : भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. ‘मी इक्बाल कासकरचा माणूस बोलतोय असे सांगत लवकरच तुला मारले जाईल’ अशी धमकी प्रज्ञा ठाकूर यांना फोनवरुन देण्यात आली आहे. भोपळमधील टीटी नगर… Continue reading प्रज्ञा ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

होडावडा-पटेलवाडीत राज्य उत्पादन शुल्कचा छापा : लाखोंचा मद्यसाठा जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा पटेलवाडी गावात राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकानं छापा टाकून लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त केला. तर याप्रकरणी आरोपी लक्ष्मीप्रसाद मांजरेकर याला फरार घोषित करण्यात आले आहे. पटेलवाडी गावात एका काजू फँक्टरी समोरच्या पत्राच्या शेडमध्ये अवैध मद्यसाठा असल्याची माहिती कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार या… Continue reading होडावडा-पटेलवाडीत राज्य उत्पादन शुल्कचा छापा : लाखोंचा मद्यसाठा जप्त

हेरवाडमधील भिशी चालकाविरोधात पोलिसांत तक्रार

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे गेल्या दोन वर्षांपासून भिशी भरणाऱ्या गोरगरिबांना चकवा देऊन चालढकल करणाऱ्या भिशी चालकाविरोधात कुरुंदवाड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित तपासी पोलीस कर्मचाऱ्यावर हेरवाड गावातून काही पुढारी राजकीय दबाव टाकत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आमच्या घामाचे पैसे बुडाल्यास याला संबंधित राजकीय पुढारी जबाबदार असतील, असे मत… Continue reading हेरवाडमधील भिशी चालकाविरोधात पोलिसांत तक्रार

पुण्यात बसचालकाकडून महिलेवर बलात्कार

पुणे (प्रतिनिधी) :  एका ट्रॅव्हल्सच्या बसचालकाने पुण्यात आलेल्या २१ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बसचालकाला स्वारगेट पोलिसांनी केली अटक केली आहे. नवनाथ शिवाजी भोग (वय ३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे.  वाशीम येथून पुण्यात आलेले हे दाम्पत्य काम शोधत होते. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एस.टी स्टँड… Continue reading पुण्यात बसचालकाकडून महिलेवर बलात्कार

ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या भावास अटक

बंगळुरु (वृत्तसंस्था) : ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता शक्ति कपूरचा मुलगा सिद्धांत कपूरला अटक करण्यात आली आहे. बंगळुरु पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली. मेडिकल टेस्टमध्ये सिद्धांत कपूरने ड्रग्ज घेतल्याचे उघड झाले आहे. सिद्धांत कपूरला बंगळुरुच्या उलसुरु पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले  आहे. बंगळुरू पोलिसांनी शहरातील एमजी रोडवर असलेल्या एका हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांनी… Continue reading ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या भावास अटक

गारगोटीमध्ये जोतिर्लिंग, गणपती मंदिरातील दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडल्या…

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटीच्या जोतिर्लिंग मंदिर आणि गणपती मंदिरातील अज्ञात चोरट्यांनी दानपेट्या ९ किंवा १० जूनच्या पहाटे फोडून सुमारे २० हजारांची रोकड लंपास केली. या बाबतची तक्रार मंदिराचे पुजारी संदिप गुरव यांनी भुदरगड पोलीस स्टेशनला दिली. पोलीसातून मिळालेली माहिती अशी की, ९ किंवा १० जूनच्या पहाटे   अज्ञात चोरट्यांनी जोतिर्लिंग मंदिराच्या सभामंडपातील दानपेटीचे कुलूप व साखळी… Continue reading गारगोटीमध्ये जोतिर्लिंग, गणपती मंदिरातील दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडल्या…

आजरा कारखाना बेअरिंग चोरी प्रकरणी ५ जणांना अटक

आजरा (प्रतिनिधी) : गेले कित्येक दिवस वादाचा बनलेल्या बेअरिंग चोरी प्रकरणाच्या मुद्द्याला पोलिसांच्या तपासात वेगळेच वळण मिळाले. चोरीची फिर्याद देणारे तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक आरोपी झाले आहेत. कार्यकारी संचालकसह ५ जणांना पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली असून, या प्रकरणात आणखीन गळाला मासे लागण्याची शक्यता आहे. आजरा कारखान्यातून ६ बेअरिंग चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी… Continue reading आजरा कारखाना बेअरिंग चोरी प्रकरणी ५ जणांना अटक

धक्कादायक बातमी : सांगलीच्या उपजिल्हाधिकारी हर्षदा गेडाम यांच्यावर चाकूहल्ला

सांगली (प्रतिनिधी) :  सांगलीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास जॉगिंगला गेलेल्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर अज्ञाताने चाकू हल्ला केला. यामध्ये गेडाम यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षलता गेडाम या… Continue reading धक्कादायक बातमी : सांगलीच्या उपजिल्हाधिकारी हर्षदा गेडाम यांच्यावर चाकूहल्ला

error: Content is protected !!