कोल्हापुरात 40 किलो अफू, 1 किलो गांजा जप्त : तिघांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका खोलीत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून 40 किलो अफू आणि एक किलो गांजासह तिघांना ताब्यात घेतले आहे. या अमली पदार्थाची एकूण किंमत 5 लाख 21 हजार 400 रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे कोल्हापूर आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थांचा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.… Continue reading कोल्हापुरात 40 किलो अफू, 1 किलो गांजा जप्त : तिघांना अटक

मुंबई विमानतळावर 100 कोटींचे कोकेन जप्त : दोन महिलांना अटक

मुंबई (प्रतिनिधी) : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला मोठं यश मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या रॅकेट डीआरआयने उद्धवस्त केलं असून इथियोपीयामधून भारतात तस्करी करण्यात येत असलेलं 100 कोटींचं कोकेन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलं आहे. या कारवाईत डीआरआयने 9.829 किलो कोकेन जप्त केलं आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 100 कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जात… Continue reading मुंबई विमानतळावर 100 कोटींचे कोकेन जप्त : दोन महिलांना अटक

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप

मुंबई/प्रतिनिधी : माजी पोलीस अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना लखनभैया एन्काऊंटर केस प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. 2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लखनभैया एन्काऊंटर केस प्रकरणात मुंबई हायकोर्टाने माजी पोलिस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष… Continue reading एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप

मोठी बातमी : फोंडाघाट चेकपोस्टवर 10 लाखांची रोकड जप्त

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट चेकपोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणी दरम्यान दहा लाखांची रोख रक्कम, चार चाकी जप्त केली आहे. ही कारवाई आज (मंगळवार) सकाळी ११.३० सुमारास करण्यात आली आहे. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जात असणाऱ्या चारचाकीमध्ये १० लाखांची रक्कम आढळून आली. उपविभागीय पोलीस… Continue reading मोठी बातमी : फोंडाघाट चेकपोस्टवर 10 लाखांची रोकड जप्त

शेडशाळ येथे पत्नीचा खून : एकाला 10 वर्षांचा सक्षम कारावास

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शेडशाळ (ता. शिरोळ) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केल्याप्रकरणी तसेच आईला सोडविण्यासाठी आलेल्या मुलीलाही मारहाणीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तम्मणा कृष्णा जयण्णावर याला जयसिंगपूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली आहे. तसेच मुलीला मारहाणीचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड अशी… Continue reading शेडशाळ येथे पत्नीचा खून : एकाला 10 वर्षांचा सक्षम कारावास

आलास येथे जुगार अड्ड्यावर छापा : पाच जणांना अटक

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : आलास (ता. शिरोळ) हद्दीत शिरोळ तालुका खरेदी विक्री पेट्रोल पंपासमोर झाडाखाली उघडयावर तीन पानी जुगार खेळताना कुरुंदवाड पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेवून अटक केली. त्यांच्याकडून ८ हजार ८००, एक मोबाईल हँडसेट, दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख ४३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल (शुक्रवार) सायंकाळी केली. यामध्ये पोलिसांनी… Continue reading आलास येथे जुगार अड्ड्यावर छापा : पाच जणांना अटक

शेडशाळ येथे तिघांना मारहाण : सहा जणांवर गुन्हा दाखल

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शेडशाळ (ता. शिरोळ) येथील यात्रेतील करमणूकीच्या कार्यक्रमात शांत बसा म्हटल्याचा राग मनात ठेवून घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी जखमी प्रदिप हणमंतराव देसाई (मुळ रा. शेडशाळ, सध्या रा. प्रतिभानगर, कोल्हापूर ) यांनी या घटनेची फिर्याद दिली… Continue reading शेडशाळ येथे तिघांना मारहाण : सहा जणांवर गुन्हा दाखल

दत्तवाड येथे एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : पानपट्टीचे दुकान बंद करणारी तू कोण, असा जाब विचारत महीलेच्या अंगावर धावून जावून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी सतिश परशुराम वडर (रा. दत्तवाड, ता. शिरोळ) याच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पिडीत महीलेने याबाबतची फिर्याद दिली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी घडली. पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार,… Continue reading दत्तवाड येथे एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल…

घोसरवाड येथे ग्रामसेवकाला मारहाण : एकावर गुन्हा दाखल

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : घोसरवाड (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायतीची करवसूलीसाठी गेलेल्या ग्रामसेवकाच्या अंगावर धावून जावून मारहाण केल्याप्रकरणी रंगराव भाऊ कांबळे (रा. काळम्मावाडी वसाहत, घोसरवाड) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद ग्रामसेवक संतोष बाबूराव चव्हाण (मूळ रा. वसंतवाडी, ता. पुसद, जि. यवतमाळ, सध्या रा. गणंजयनगर, कुरुंदवाड) यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे.… Continue reading घोसरवाड येथे ग्रामसेवकाला मारहाण : एकावर गुन्हा दाखल

तेरवाड येथे अवैध गुटखा पोलीसांनी पकडला : ६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा वाहतूक करताना तेरवाड (ता. शिरोळ) येथे कुरुंदवाड पोलिसांनी कर्नाटकातील दोघांना अटक केले आहे. निहाल राजेश हवालदार (वय २४) आणि मोहम्मदइर्शान साजीद बागवान (वय २९, दोघे रा. निपाणी, कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपयांचा गुटखा आणि चारचाकी स्कोडा कंपनीची गाडी असा एकुण… Continue reading तेरवाड येथे अवैध गुटखा पोलीसांनी पकडला : ६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

error: Content is protected !!