‘त्या’ बेपत्ता माय-लेकींची पंचगंगेत आत्महत्या…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  काल (शनिवार) पासून बेपत्ता असलेल्या माय लेकींचा पंचगंगा नदीपात्रात मृतदेह आढळून आला. सुनेत्रा संतोष सावळकर (वय ३२), खुशी सावळकर (वय १०) आणि श्रीशा सावळकर (वय ७) सर्व राहणार वडणगे अशी मृत्यू झाल्याची नावे आहेत. आज (रविवारी) ही घटना उघडकीस आली. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी… Continue reading ‘त्या’ बेपत्ता माय-लेकींची पंचगंगेत आत्महत्या…

अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला धोका : पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक केलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांची रवानगी तळोजा  कारागृहात आज (रविवार) सकाळी करण्यात आली. अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांनाही तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. या तिघांना  अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवले होते. दरम्यान, अलिबाग येथील कारागृह… Continue reading अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला धोका : पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

कोरोनाची लस तयार करणाऱ्या ‘या’ कंपन्यांवर ‘हॅकर्स’ची नजर…

मुंबई (प्रतिनिधी) : संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना संकटावर मत करण्यासाठी सध्या सर्वच स्तरातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होऊ नये, म्हणून प्रशासन काटेकोर पद्धतीने कारवाई करत आहे. त्याचप्रमाणे कोरोनावर लस शोधण्यासाठी नावाजलेल्या औषध कंपन्या दिवसरात्र एक करून काम करत आहेत. मात्र मागील मागील काही दिवसांपासून या औषध कंपन्यांबाबतीत हॅकिंगच्या घटना घडत आहेत. हॅकर्सनं… Continue reading कोरोनाची लस तयार करणाऱ्या ‘या’ कंपन्यांवर ‘हॅकर्स’ची नजर…

फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग : ५० हजारांचे नुकसान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील हिंमतबहादूर परिसरातील वैशाली अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी एका बंबाच्या साहाय्याने ही आग वेळीच आटोक्यात आणली. याबाबतची अधिक माहिती अशी, वैशाली अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहुल सुलताने राहतात. आज दुपारच्या सुमारास त्यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये… Continue reading फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग : ५० हजारांचे नुकसान

महाद्वार रोडवरील दुकानातून महिलेची पर्स लंपास…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील महाद्वार रोड येथील एका कपड्याच्या दुकानामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने यासह सुमारे १ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी किरण प्रेमराज हेगडे (वय २६, रा. राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. राजलक्ष्मीनगर… Continue reading महाद्वार रोडवरील दुकानातून महिलेची पर्स लंपास…

महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सौर यंत्रणेचे प्रकरण मंजूर करून देण्यासाठी सहा हजार रूपयांची लाच कार्यालयामध्ये स्वीकारताना उत्तर विभाग महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब परशराम मांडके  (वय ५२, रा. एसटी कॉलनीजवळ, ताराबाई पार्क) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदाराने आपल्या वडीलांचे… Continue reading महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक…

कोल्हापूर शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात मोटरसायकल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील मध्यवर्ती भाग आणि उपनगरात घरासमोर पार्क केलेल्या दुचाकींना चोरट्यानी लक्ष केले आहे. दररोज दोन ते तीन घटना शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घडत आहेत. भरदिवसा हे चोरटे मोटरसायकलीवर हात साफ करतात. शहरासह उपनगरात चोरट्यानी थैमान घातले आहे. यापाठोपाठ आता चोरट्यानी शहरातील दुचाकींवर निशाणा केला… Continue reading कोल्हापूर शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट…

लाखोंचा गंडा घालणाऱ्या ‘व्हिजन अॅग्रो’च्या विकास खुडेला अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनेक बेरोजगार तरुणांना जादा परताव्याचे आमिष दाखवून ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांची फसवणूक करून फरारी झालेल्या व्हिजन ग्रीन अॅग्रो प्रॉडक्टस व वी अँड के अॅग्रो प्रॉडक्ट या कंपनीचा सूत्रधार विकास जयसिंग खुडे (वय ३२, रा. पोर्ले, ता. पन्हाळा) हा बुधवारी रात्री स्वतःहून पोलिसात हजर झाला. आज न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस… Continue reading लाखोंचा गंडा घालणाऱ्या ‘व्हिजन अॅग्रो’च्या विकास खुडेला अटक

मुलीवर अत्याचार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी मोरेवाडीतील तरुणावर गुन्हा  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात पीडित मुलीने करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. अभय बाळासाहेब मोरे (वय २२, रा.मोरेवाडी ता. करवीर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोरेवाडी येथे राहणारा अभय मोरे याने एका  अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण करून… Continue reading मुलीवर अत्याचार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी मोरेवाडीतील तरुणावर गुन्हा  

वडणगे येथे मित्राच्याच घरात केला हात साफ; तीस हजारांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मित्राच्याच घरामध्ये राहणाऱ्या एकाने मित्राची मोटरसायकल आणि मोबाईल असा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी खय्युम गफूर नरंगलकर (वय २२, मूळ रा. नरंगलक देगळूर जि. नांदेड, सध्या रा. वडणगे) याने आकाशसिंग रणजीतसिंग ठाकूर (मूळ रा. असापूर, जि. नांदेड, सध्या रा. वडणगे) याच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.… Continue reading वडणगे येथे मित्राच्याच घरात केला हात साफ; तीस हजारांचा मुद्देमाल लंपास

error: Content is protected !!