पॉल दिनाकरन यांच्याकडून कोट्यावधींची मालमत्ता जप्त : आयकर विभागची कारवाई

चेन्नई (वृत्तसंस्था) : तमिळनाडूमधील ईसाई धर्म प्रचारक पॉल दिनाकरन यांच्या निवासस्थान आणि कार्यालय असे मिळून २८ ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. ज्या भागात छापेमारी केली आहे, त्यात करुण्या तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्था आणि जीजस कॉल्स मंत्रालयाचा समावेश आहे. यामध्ये कोट्यावधींची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यावेळी तब्बल साडेचार किलो वजनाचे सोने जप्त केलं आहे.… Continue reading पॉल दिनाकरन यांच्याकडून कोट्यावधींची मालमत्ता जप्त : आयकर विभागची कारवाई

गडहिंग्लजमध्ये आई, मुलाची आत्महत्या…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लज येथील घाळी कॉलनीत राहत्या घरी आई आणि मुलाने गळफास घेतल्याची घटना काल (शुक्रवार) रात्री उघडकीस आली आहे. वैशाली आनंद कोठावळे (वय ४४) आणि अवधूत आनंद कोठावळे (वय १८) अशी त्यांची नावे आहेत. ते दोघे गडहिंग्लज पंचायत समितीकडील ग्रामसेवक आनंद कोठावळे यांची पत्नी आणि मुलगा आहेत. सज्ञान मुलासह आईने आत्महत्या केल्याने परिसरात… Continue reading गडहिंग्लजमध्ये आई, मुलाची आत्महत्या…

बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मावर भाजप नेत्या संतापल्या   

मुंबई (प्रतिनिधी) : रेणू शर्मा  यांनी राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेला बलात्काराचा आरोप मागे घेतला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत रेणूवर मुंबई पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाघ यांनी ट्विट करत म्हटले आहे की, खोटे आरोप करणं, खोटे गुन्हे दाखल करणं चुकीचंच आहे. खोट्या आरोपांमुळे… Continue reading बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मावर भाजप नेत्या संतापल्या   

लाच घेणारे महावितरणचे दोन शिपाई ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वडिलांच्या निवृत्ती वेतनचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एका व्यक्तीकडून ५०० रूपयांची लाच घेणाऱ्या ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयातील दोघा शिपायांना आज (गुरूवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. चंद्रकांत ऊर्फ बाळू साताप्पा मांढरेकर (वय ३६, रा. केनवडे ता.कागल), सुनिल यशवंत हजारे (वय ३० रा.हुन्न्रुर, ता. कागल) अशी अटक केलेल्या दोन कंत्राटी शिपायांची नावे आहेत.… Continue reading लाच घेणारे महावितरणचे दोन शिपाई ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

शिरोली पुलाची येथील झालेल्या मारहाणीतील जखमीचा मृत्यू…

टोप (प्रतिनिधी) :  घराच्या जागेवरून झालेल्या मारहाणीत शिरोली पुलाची येथील अशोक नवनाथ जानराव (वय ५७ ) यांचा उपचारादरम्यान आज (मंगळवार) मृत्यू झाला. याबाबत चुलत भाऊ, चुलती, भावजय यांच्यावर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद अमोल अशोक जानराव याने दिली आहे. मयत अशोक जानराव आणि यातील आरोपी संतोष अभिमान जानराव, सुधाकर अभिमान जानराव,… Continue reading शिरोली पुलाची येथील झालेल्या मारहाणीतील जखमीचा मृत्यू…

बेकायदेशीररीत्या घरगुती वापराचा गॅस वाहनात भरणाऱ्याला अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूनगर येथे घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्या एकाला राजारामपुरी पोलिसांनी काल (शनिवार) रात्री उशिरा अटक केली. वीरभद्र विरय्या हिरेमठ (वय ४१, रा. शाहूनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सात हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगर येथे घरगुती वापराचा गॅस वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या भरला जात असल्याची माहिती राजारामपुरी  पोलिसांना… Continue reading बेकायदेशीररीत्या घरगुती वापराचा गॅस वाहनात भरणाऱ्याला अटक…

यड्रावमध्ये शर्टाने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव (ता. हातकणंगले) येथील पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये एका तरुणाने कंपाउंडच्या अँगलला स्वतःच्या शर्टाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आज (रविवार) सकाळी उघडकीस आला. सचिन बसवराज पाटील (रा.पार्वती गेटसमोर खोतवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नांव आहे. त्यांने मानसिक ताणतणावाखाली आत्महत्या केल्याचे समजते. सचिन पाटील यांने आज सकाळी आत्महत्या केल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास… Continue reading यड्रावमध्ये शर्टाने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

‘दारू पिउन गाडी चालवतोस का ?’ : महेश मांजरेकरची एकाला मारहाण

पुणे (प्रतिनिधी) : पुणे- सोलापूर महामार्गावर गाडीला धडक दिल्याने एकाला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी टेंभुर्णीतील कैलास सातपुते यांनी तक्रार केली. त्यानंतर यवत पोलीस ठाण्यात मांजरेकर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.  ही घटना  शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. महामार्गावर समोरच्या वाहन… Continue reading ‘दारू पिउन गाडी चालवतोस का ?’ : महेश मांजरेकरची एकाला मारहाण

टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात १० महिला ठार ; ९ जण गंभीर जखमी

बंगळुरु (प्रतिनिधी) : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला टिपरने धडक दिल्यामुळे धारवाडमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी १७ महिला गोव्याला निघाल्या असताना काळाने घाला घातला. कर्नाटकमध्ये धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. पहाटे ३ वाजताच्या सुमारास टिप्परने टेम्पो ट्रॅव्हलरला… Continue reading टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात १० महिला ठार ; ९ जण गंभीर जखमी

सराईत चोरट्याकडून दोन मोटारसायकली जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना राजवाडा पोलिसांनी आज (गुरुवार) एका सराईत मोटरसायकल चोरट्यास अटक केली. सुहास सदाशिव सटाले (वय ४२, रा. जिवबानाना जाधव पार्क) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ८० हजार रुपयांच्या २ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. एक सराईत मोटरसायकल चोरटा मैलखड्डा परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शोधपथकाला मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा… Continue reading सराईत चोरट्याकडून दोन मोटारसायकली जप्त

error: Content is protected !!