दिवाळीपूर्वी ‘अदानीं’च्या कंपनीने कमावला तब्बल ₹ 276 कोटींचा नफा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अदानी एनर्जी सोल्युशन्सने सोमवारी सप्टेंबर तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ वार्षिक नफा 34 % ने वाढून रु. 276 कोटी झाला आहे. यांचा महसूल सुमारे 13 % वाढून 3,674 कोटी रुपये झाला. तसेच या तिमाहीत इतर उत्पन्न रु. 93 कोटी होते, जे एका वर्षापूर्वी रु. 125… Continue reading दिवाळीपूर्वी ‘अदानीं’च्या कंपनीने कमावला तब्बल ₹ 276 कोटींचा नफा

भारताशी पंगा घेणे कॅनडाला पडतंय महागात; अनेक हिरे कंपन्यां***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) खलिस्तानी मुद्द्यावरून कॅनडाने भारतासोबतचे संबंध बिघडवून स्वतःच्या पायावर गोळी झाडली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या एका वक्तव्यामुळे भारत आणि कॅनडाच्या राजनैतिक संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. खलिस्तानींची बाजू घेत असताना कॅनडाने भारताविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा परिणाम आता त्याच्याच व्यवसायावर होत आहे. कॅनडातील सर्वात मोठ्या हिरा कंपनीने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज केला… Continue reading भारताशी पंगा घेणे कॅनडाला पडतंय महागात; अनेक हिरे कंपन्यां***

चीनच्या शत्रूला भारताने 7 हेलिकॉप्टर केले गिफ्ट; युद्धात सैनिकांसाठी बनतील संकटमोचक

दिल्ली ( वृत्तसंस्था ) चीनचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या फिलिपाइन्सला भारताने सात हेलिकॉप्टर देऊ केले आहेत. या हेलिकॉप्टरचा उपयोग युद्धाव्यतिरिक्त, बचाव कार्य आणि मानवतावादी प्रयत्नांसाठी केला जाऊ शकतो. फिलीपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर यांनी रविवारी अधिकृत माहिती देत भारताने फिलीपिन्सला किमान सात हेलिकॉप्टर देऊ केले असल्याचं म्हटलं दक्षिण चीन समुद्रात फिलीपिन्सचे चीनसोबतचे संबंध बिघडत… Continue reading चीनच्या शत्रूला भारताने 7 हेलिकॉप्टर केले गिफ्ट; युद्धात सैनिकांसाठी बनतील संकटमोचक

इस में तुम्हारा घाटा, हमारा कुछ नहीं जाता; भारताने कॅनडाला ठणकावले

दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारत – कॅनडा यांच्यात अनेक महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत आरोप केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले. भारत सरकारनेही भारतात उपस्थित असलेल्या अनेक कॅनेडियन मुत्सद्यांना देश सोडण्याचा अल्टिमेटम देऊन प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशा दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कॅनडाला कडक संदेश… Continue reading इस में तुम्हारा घाटा, हमारा कुछ नहीं जाता; भारताने कॅनडाला ठणकावले

धक्कादायक..! नेपाळ भूकंपात 136 ठार; आकडा वाढण्याची शक्यता

दिल्ली ( वृत्तसंस्था ) नेपाळमधीलजाजरकोटच्या पश्चिम भागात शुक्रवारी झालेल्या जोरदार भूकंपात किमान 136 लोक ठार आणि डझनभर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की शेकडो घरांची पडझड झाली. मदत आणि बचावकार्यात गुंतलेल्या एजन्सींनी सांगितले की, भूकंपामुळे आतापर्यंत 136 लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या… Continue reading धक्कादायक..! नेपाळ भूकंपात 136 ठार; आकडा वाढण्याची शक्यता

भारतीय भालाफेक पट्टूने मागे टाकल्याचा पश्चाताप होणार नाही- नीरज चोप्रा

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) भारताच्या स्टार भालाफेकपटूने अनेक विजेतेपद आपल्या नावावर केली आहेत. त्याने ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई खेळ आणि डायमंड लीगमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. 25 वर्षीय चोप्रा सध्या भालाफेक खेळातील अव्वल खेळाडूंमध्ये स्थान मिळवत आहे. मात्र, एक दिवस दुसरा खेळाडू येऊन आपल्याला मागे टाकेल, हे चोप्रांना चांगलेच ठाऊक आहे. चोप्रा सांगतात की, कोणत्याही… Continue reading भारतीय भालाफेक पट्टूने मागे टाकल्याचा पश्चाताप होणार नाही- नीरज चोप्रा

दिसतं तसं नसतं; झोमॅटो सीईओंचा ऑफरबद्दल कबुलीनामा

मनोरंजन ( प्रतिनिधी ) झोमॅटो कंपनीचे सीईओ दीपंदर गोयल यांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato वर दिसणार्‍या सवलतीच्या ऑफरबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्यांनी कबूल केले आहे की, झोमॅटो प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे सवलती दाखवल्या जातात त्या ग्राहकांची दिशाभूल करत आहेत आणि हे बदलणे आवश्यक आहे. खरं तर, यूट्यूबर रणवीर अल्लाबदियाच्या पॉडकास्ट ‘द रणवीर शो’… Continue reading दिसतं तसं नसतं; झोमॅटो सीईओंचा ऑफरबद्दल कबुलीनामा

एकच हृदय किती वेळा जिंकणार..! ‘रोहित’ने छोट्या चाहत्याला दिलं अप्रतिम गिफ्ट

मुंबई ( वृत्तसंस्था ) आयसीसी वनडे विश्वचषक 2023 भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत सुवर्ण स्वप्नापेक्षा कमी राहिलेला नाही. तो एकामागून एक सामने जिंकत आहे. नुकताच श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्यांचा पराभव करणे आता अवघड नसून अशक्य वाटत आहे. या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांना भेटताना… Continue reading एकच हृदय किती वेळा जिंकणार..! ‘रोहित’ने छोट्या चाहत्याला दिलं अप्रतिम गिफ्ट

अत्यावश्यक तेव्हाच खटले तहकूब करा; सरन्यायाधिशांनी वकिलांना खडसावले

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सरन्यायाधिश डी. वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयात खटले पुढे ढकलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याला ‘तारीखे नंतरची तारीख’ कोर्ट होऊ देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, केस दाखल करण्याच्या आणि यादी करण्याच्या न्यायालयाच्या सुधारण्याच्या प्रक्रियेवरही याचा परिणाम होतो. त्यांनी बारला आवाहन केले आहे की, जेव्हा अत्यंत… Continue reading अत्यावश्यक तेव्हाच खटले तहकूब करा; सरन्यायाधिशांनी वकिलांना खडसावले

मणिपूरमध्ये मोठ्या कारवाईची तयारी ? 200 सैनिक विमानाने दाखल

मणिपूर ( वृत्तसंस्था ) मणिपूरमध्ये मोरे येथील पोलीस अधिकारी चिंगथम आनंद कुमार यांच्या हत्येनंतर स्थानिकांमध्ये संताप वाढला आहे. त्यामुळे आसाम रायफल्सच्या 200 हून अधिक सैनिकांना जातीय संघर्षग्रस्त मणिपूरमधील मोरेह येथे विमानाने पाठवण्यात आले आहे. तसेच काही सैन्य मोरेहमध्ये ( भारत-म्यानमार सीमा ) लपून बसलेले दहशतवादी ओळखण्यात गुंतले आहे. वृत्त वाहिन्यांना वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या… Continue reading मणिपूरमध्ये मोठ्या कारवाईची तयारी ? 200 सैनिक विमानाने दाखल

error: Content is protected !!