जि. प. सदस्य हेमंत कोलेकरांच्यावर गुन्हा

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणुकीत शपथपत्रात गुन्ह्याबाबत माहिती लपविल्याप्रकरणी नेसरी जि. प. मतदार संघाचे सदस्य हेमंत कोलेकर यांच्या विरोधात गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नेसरी येथील प्रकाश दळवी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नायब तहसिलदार अशोक पाटील यांनी गडहिंग्लज पोलिसांत फिर्याद दाखल केली. याबाबत अधिक… Continue reading जि. प. सदस्य हेमंत कोलेकरांच्यावर गुन्हा

शिरोली दुमालातील कोरोनाने मयत झालेल्या कुटुंबियांची तहसिलदारांकडून विचारपूस

सावरवाडी (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची करवीरच्या तहसीलदार शितल मुळे-भांबरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच काळजी घेण्याच्या सुचना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत गट विकास अधिकारी जयंत उगले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी. डी. नलवडे, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, करवीर पं.स. सदस्य राजेंद्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते. शिरोली दुमाला… Continue reading शिरोली दुमालातील कोरोनाने मयत झालेल्या कुटुंबियांची तहसिलदारांकडून विचारपूस

फी वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करावी : भाजपाची मागणी 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या पालकांच्या समोर शैक्षणिक फी भरण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसुली केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक यांना निवेदन दिले.  या निवेदनात, सध्याच्या या आर्थिक संकटामध्ये चालू शैक्षणिक वर्षाची फी ५०% शासनाने भरावी व उर्वरित ५०% फी माफ… Continue reading फी वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करावी : भाजपाची मागणी 

करवीर तालुक्यात खरीप पिकांच्या काढणीच्या कामात व्यत्यय…

सावरवाडी (प्रतिनिधी) : गेल्या चार-पाच दिवसापासून करवीर तालुक्यात जोरदार रब्बीच्या पावसाने जोर धरला आहे. दररोज पावसाच्या हजेरीने खरीप पिकांच्या काढणीच्या कामात व्यत्यय येत आहे. ऐन भरणीला येणारी भाताची पीके कोलमडू लागली आहेत. परिणामी भातपिकांचे नुकसान होऊ लागले आहे. जोरदार पावसामुळे करवीर तालुक्यात सर्वत्र भुईमग, सोयाबीन पिकांच्या काढणीची कामे थंडावली आहेत. जोरदार पावसामुळे आडसाली ऊस लागणीच्या… Continue reading करवीर तालुक्यात खरीप पिकांच्या काढणीच्या कामात व्यत्यय…

लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा : तहसिलदार शीतल मुळे-भामरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम करवीर तालुक्यात प्रभावीपणे राबवण्यात येईल. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत पुढाकार घ्यावा. लोकप्रतिनिधी आपल्या गावात मोहिमेची प्रचार, प्रसिद्धी करुन गावकऱ्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन तहसिलदार शीतल मुळे-भामरे यांनी केले. यावेळी त्यांनीउजळाईवाडी येथे भेट देऊन आरोग्य पथकामार्फत सुरु असलेल्या तपासणीत सहभाग घेतला. तहसिलदार म्हणाल्या की,… Continue reading लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा : तहसिलदार शीतल मुळे-भामरे

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची व्यापक जागृती करा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या सरकारच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या मोहिमेची व्यापक जागृती करावी. नगरपालिका क्षेत्रात नगरसेवक, सामाजिक संस्था, तरुण मंडळे यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसिध्दी करावी. चौका-चौकात होर्डिंग्ज लावावीत. प्रभागातील घराघरांवर स्टिकर्स लावावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या. ते  जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे… Continue reading ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची व्यापक जागृती करा : जिल्हाधिकारी

जरग विद्यामंदिर शाळेसाठी आणखी तीन वर्गांची लवकरच उभारणी : महापौर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेसाठी आणखीन 3 वर्गखोल्यांची लवकरच उभारणी केली जाईल, असे प्रतिपादन महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. आज जरगनगर येथील जरग विद्यामंदिर शाळेस महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत… Continue reading जरग विद्यामंदिर शाळेसाठी आणखी तीन वर्गांची लवकरच उभारणी : महापौर

धामणीखोऱ्यातील नागरिकांतून बस सेवा सुरू करण्याची मागणी

कळे (अनिल सुतार) : धामणीखोऱ्यात कोल्हापूर ते म्हासुर्ली, बावेली, चौके अशा एस टी बस सेवा सुरू होत्या. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा थांबवण्यात आली आहे. सध्या मात्र भागातील अनेक कामगार कोल्हापूर येथे कामावर जात असल्याने त्यांना प्रवासासाठी अडचणी येत आहेत. तसेच अनेक नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी काही कामानिमित्त जावे लागत असून मोठ्या प्रमाणात प्रवासाची गैरसोय होत… Continue reading धामणीखोऱ्यातील नागरिकांतून बस सेवा सुरू करण्याची मागणी

शिरोली पोलीस स्टेशनकडून संजित जगताप यांच्या कुटुंबास ४ लाख २१ हजार सुपूर्द

टोप (प्रतिनिधी) : शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवंगत संजित विलासराव जगताप हे दिनांक २६ ऑगस्ट रोजी कोरोना विषाणू संसर्गामुळे संजय घोडावत कोविड सेंटर येथे उपचार घेत असताना मृत झाले होते. आज (बुधवार) त्यांच्या कुटुंबास शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जमा झालेली ४ लाख २१००० हजारांची आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केली. यामध्ये शिरोली… Continue reading शिरोली पोलीस स्टेशनकडून संजित जगताप यांच्या कुटुंबास ४ लाख २१ हजार सुपूर्द

२५ सप्टेंबरच्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी सहभागी : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे २५ सप्टेंबरला पुकारलेल्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होईल. शेतकरी विरोधी विधेयके संमत केल्याच्या निषेधार्थ राज्यातील शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे. पत्रकाकत म्हटले आहे की, मोदी सरकारने राज्यसभेत ३ शेतकरी विधेयकांना मंजुरी दिली.… Continue reading २५ सप्टेंबरच्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी सहभागी : राजू शेट्टी

error: Content is protected !!