…तर मराठा आरक्षणासाठी पुढील तारीख का मागितली ? : खा. संभाजीराजे (व्हिडिओ)

मराठा आरक्षणाच्या सुनावणीबाबत राज्य सरकारने पूर्ण तयारी केली होती. मग सुनावणीची पुढील तारीख का मागितली याचा खुलासा करावा, अशी मागणी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी केली.  

शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळणार… : नेत्यांनी फेटाळला केंद्र सरकारचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेले आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने याबाबत दिलेला तडजोडीचा प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळला आहे. सरकारने दिलेला प्रस्ताव मान्य नसल्याने नवा प्रस्ताव येईपर्यंत देशभरात आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी आज (बुधवार) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिला.… Continue reading शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळणार… : नेत्यांनी फेटाळला केंद्र सरकारचा प्रस्ताव

शिवसेना महापालिका निवडणुकीचे ‘धनुष्य’ कसे पेलणार ?  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीला एकसंघपणे सामोरे जाण्याची तयारी शहर शिवसेनेतर्फे होताना दिसत नाही. गटा-तटात सेना विभागल्याने आगामी निवडणुकीला सामोरे जाताना त्यांना आव्हानांचा डोंगर उभा राहणार आहे. वास्तविक जिल्ह्यात शिवसेनेचे एक आमदार, दोन खासदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्षपद (कॅबिनेट दर्जाचे) आहे. लढाऊ शिवसैनिक आहेत, पण एकी नाही. एकीकडे… Continue reading शिवसेना महापालिका निवडणुकीचे ‘धनुष्य’ कसे पेलणार ?  

जीएसटी ई-वे बिल ब्लॉकिंग न करता उद्योजकांना संधी द्यावी : ‘कोल्हापूर चेंबर’ची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जीएसटी ई-वे बिल ब्लॉकिंग न करता व्यापारी व उद्योजकांना संधी द्यावी अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने करण्यात आली. शिष्टमंडळातर्फे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत केंद्रीय जीएसटी विभाग आयुक्त विद्याधर थेटे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की मार्चपासून कोविड-१९ या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला… Continue reading जीएसटी ई-वे बिल ब्लॉकिंग न करता उद्योजकांना संधी द्यावी : ‘कोल्हापूर चेंबर’ची मागणी

सरपंचपदासाठी पुढील आठवड्यात आरक्षण सोडत : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायती मध्ये सन २०२०-२५ साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसधारण स्त्री सरपंच पदासाठी मंगळवार, दि. १५ रोजी डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की,… Continue reading सरपंचपदासाठी पुढील आठवड्यात आरक्षण सोडत : जिल्हाधिकारी

चंद्रकांतदादा, तुम्ही कृषी मंत्री झालात का गृहमंत्री ? : संजय पवार (व्हिडिओ)

शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कायद्यांचे समर्थन करणारे चंद्रकांतदादा पाटील आता कृषी मंत्री किंवा गृहमंत्री झालेत का, असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला.  

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आता अडीचशेहून कमी रुग्ण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात २८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७१० जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा.… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आता अडीचशेहून कमी रुग्ण

रिक्षाचालकाच्या खूनप्रकरणी दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून योगेश मनोहर शिंदे (वय २८, रा. बालावधूत नगर, फुलेवाडी) या रिक्षाचालकाचा त्याच्याच मित्रांनी डोक्यात दगड घालून खून केला. सोमवारी रात्री हा प्रकार वडणगे पोवार पाणंद रस्त्यावरील बंडगर मळ्यात घडला होता. या प्रकरणी करवीर पोलिसांनी दीपक रघुनाथ पोवार (वय ३५, रा. उद्यम नगर), सागर दत्तात्रय चौगले (वय ३०,… Continue reading रिक्षाचालकाच्या खूनप्रकरणी दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

कुंभी कासारी कारखाना वाचविण्यासाठी समविचारी नेत्यांची गरज : प्रा. टी. एल. पाटील

सावरवाडी (प्रतिनिधी) : कुंभी कासारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा आर्थिक कणा होता. हा साखर कारखान्याचा  राजकारणासाठी वापर केला गेल्याने कारखाना डबघाईला आला. कर्जबाजारी बनलेल्या कुंभी कासारी साखर कारखाना वाचविण्यासाठी आगामी निवडणुकीसाठी समविचारी नेत्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत शेतकरी चळवळीचे नेते व यशवंत बँकेचे संचालक प्रा. टी. एल. पाटील यांनी व्यक्त केले. कारखाना कर्जबाजारी… Continue reading कुंभी कासारी कारखाना वाचविण्यासाठी समविचारी नेत्यांची गरज : प्रा. टी. एल. पाटील

कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत

मुंबई (प्रतिनिधी) : संचालकांचा मनमानी कारभार आणि त्यांनी केलेला सुमारे ३१० कोटींचा अपहार यामुळे अडचणीत आलेल्या कराड जनता सहकार बँकेचा परवाना रद्द करण्याची कारवाई रिझर्व्ह बँकेने केली आहे. आज (मंगळवार) याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे. तसेच हा आदेश आल्यानंतर सहकार आयुक्तांनी बँक अवसायानात गेल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सभासद आणि ठेवीदारांमध्ये गोंधळ उडाला असून ते… Continue reading कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत

error: Content is protected !!